28.8 C
Mumbai
Friday, May 1, 2026
घरक्राईमनामालष्कर-ए-तैयबाचा कमांडर शेख युसुफ अफरीदीची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या

लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शेख युसुफ अफरीदीची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या

खैबर पख्तूनख्वा प्रांतात झाडल्या गोळ्या

Google News Follow

Related

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात लष्कर-ए-तैयबा (LeT) चा वरिष्ठ कमांडर शेख युसुफ अफरीदी हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या कमंडरची हत्या केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा एक लक्ष्यित (टार्गेटेड) हल्ला होता.

माहितीनुसार, युसुफ अफरीदी डोंगराळ भागात असताना हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला. त्याला अनेक गोळ्या लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर जवळच्या डोंगराळ भागाच्या वरच्या दिशेने पसार झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, अलीकडच्या महिन्यांत वाढलेल्या लक्ष्यित हत्यांच्या घटनांशी याचा संबंध जोडून पाहिला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, अफरीदी खैबर भागातील अफरीदी जमातीशी संबंधित होता आणि दहशतवादी संघटनेच्या प्रादेशिक रचनेत त्याची महत्त्वाची भूमिका होती. तो आयएसआयसाठी लष्कर-ए-तैयबामार्फत गुप्त माहिती गोळा करणे आणि पाकिस्तान सैन्यासाठी कारवाया करण्यासाठी ओळखला जात होता.

असेही सांगितले जाते की, शेख युसुफ अफरीदी हा लष्कर-ए-तैयबाच्या खैबर पख्तूनख्वा युनिटचा प्रमुख होता आणि दहशतवादी हाफिज सईदचा निकटवर्तीय होता. तसेच, तो संघटनेत भरती, विचारसरणीचा प्रसार आणि प्रांतातील दहशतवादी कारवायांचे समन्वय साधण्यात सक्रिय होता. याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि हालचाली सुलभ करण्यामध्येही त्याचा सहभाग होता.

हे ही वाचा:

पहिले होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, अणुचर्चा नंतर!

अमेरिकेच्या हिताकडे झुकलेला पाकिस्तान योग्य मध्यस्थ नाही!

पंतप्रधान मोदींनी सांगितली गौतम बुद्धांच्या संदेशांची महत्ता

बांबू उद्योगामुळे बदलत आहे ईशान्य भारतातील महिलांचे जीवन

दरम्यान, पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात दहशतवाद्यांवर हल्ल्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. अहवालांनुसार, २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ३० पेक्षा अधिक लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष्य केले गेले आहे. यात लाहोर, कराची, पंजाब, सिंध आणि बलूचिस्तान यांसारख्या भागांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा