29.8 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरक्राईमनामा"पूजा चव्हाण केसची सर्वंकष चौकशी करा" - देवेंद्र फडणवीस

“पूजा चव्हाण केसची सर्वंकष चौकशी करा” – देवेंद्र फडणवीस

Google News Follow

महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण या तरुणीचे कथित आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकरणात राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची सर्वंकष चौकशी व्हावी अशी मागणी फडणवीस यांनी या पत्राद्वारे केली आहे.

हे ही वाचा: 

परळीतील मुलीच्या आत्महत्येला विदर्भातील मंत्री कारणीभूत?

भारताने जगासाठी केला कोविड-१९ लसींचा विक्रमी पुरवठा

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येने राज्यात एकच खळबळ उडाली. साध्या या प्रकरणाशी संबंधित काही ध्वनिफिती समोर आल्या आहेत त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सध्या या क्लिप्स समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. या क्लिपच्या अनुषंगानेच या प्रकरणाची सर्वंकष चौकशी व्हावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या संबंधिच देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना पात्र लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. मुळची परळीची असलेली २२ वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकायला आली होती. तिच्या भावाबरोबर ती पुण्यात हडपसरमध्ये राहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपा या विषयात सुरवातीपासूनच आक्रमक झाला असून त्यांनी या विषयात रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा