सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे दिले कारण

राजीनामा दिल्यानंतर एक्सवर पोस्ट करत दिली प्रतिक्रिया

सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे दिले कारण

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवार, ४ मार्च रोजी सकाळी मुंडे यांच्या पीएने त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याचे कारण दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले आहे की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री यांच्याकडे दिला आहे,” असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना सांगितलं की, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कारवाईकरता राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून मुक्त करण्यात आलं आहे.

हे ही वाचा..

पीओकेमधील उपस्थितीनंतर भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करावं

छत्तीसगड: प्रार्थना सभांच्या नावाखाली आदिवासींचे धर्मांतर

बांगलादेशचे मोहम्मद युनुस म्हणतात, संघर्ष असूनही भारताशी संबंध मजबूत

बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले

सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला या प्रकरणात प्रमुख आरोपी करण्यात आले आहे. या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे. अखेर या घडामोडींनंतर धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा दुला आहे.

Exit mobile version