29.5 C
Mumbai
Saturday, November 28, 2026
घरराजकारणडिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा

डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा

स्टॅलिन यांच्या मागण्या केंद्राने मान्य केल्याने निर्णय

Google News Follow

केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता महत्त्वाची घडामोड घडली आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे (डीएमके) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या सुधारित विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तामिळनाडूच्या लोकसभेतील सध्याच्या जागांचा ७.१८ टक्के वाटा कायम ठेवण्याची मागणी केंद्राने मान्य केल्याने पक्षाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. द्रमुकच्या या भूमिकेमुळे विधेयकाच्या मंजुरीसाठी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आवश्यक असलेले संख्याबळ मिळण्याची शक्यता वाढली आहे.

द्रमुकने हे स्पष्ट केले आहे की, केंद्र सरकार पुढील आठवड्यात संसदेत आणू पाहत असलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला त्यांचा पाठिंबा असेल. शनिवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत, द्रमुकने विधेयकाला पाठिंबा देण्याचा ठराव केला. बैठकीनंतर खासदार ए. राजा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की, द्रमुक नवीन मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देईल. द्रमुक खासदार दयानिधी मारन यांनीही याचा पुनरुच्चार केला.

यापूर्वी स्टॅलिन यांनी तामिळनाडूचा लोकसभेतील जागांचा वाटा कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये, अशी भूमिका मांडली होती. तसेच १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित झालेल्या राज्यांच्या प्रतिनिधित्वाचे प्रमाण आणखी २५ वर्षे कायम ठेवण्याची मागणी केली होती.

केंद्र सरकारच्या सुधारित प्रस्तावानुसार, लोकसभेतील जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याची तरतूद आहे. मात्र, सर्व राज्यांच्या सध्याच्या जागांच्या प्रमाणात बदल होणार नाही, असे सूत्र आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या सध्याच्या ३९ जागा वाढून ५९ होण्याची शक्यता आहे. राज्याचा लोकसभेतील ७.१८ टक्के वाटा कायम राहणार आहे. महिला आरक्षणाची ३३ टक्के तरतूद २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू करण्याच्या दृष्टीनेही या विधेयकाला महत्त्व आहे.

हे ही वाचा : 

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’

मुंबईतील बॉम्बस्फोट धमक्यांमागे बनावट ई-मेलचे जाळे

पक्ष फोडणाऱ्यांच्या चरणाशी जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे

गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

द्रमुकचे २२ खासदार ठरणार निर्णायक

लोकसभेत द्रमुकचे २२ खासदार आहेत. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असल्याने या खासदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये विरोधकांनी एकजूट दाखवत विधेयकाला विरोध केला होता आणि ते मंजूर होऊ शकले नव्हते. मात्र, सुधारित प्रस्तावामुळे आता राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा