32 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारणभाजपाला पहिले यश; कोकण मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

भाजपाला पहिले यश; कोकण मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

शेकापच्या बाळाराम पाटील यांना केले पराभूत

Google News Follow

Related

शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा आत्ता पहिला निकाल लागला आहे. यात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. नुकतेच त्यांना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत करून म्हात्रे विजयी झाले आहेत यामुळेच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

भाजपने आपले खते उघडून सुरूवात केल्यामुळे आनंदी आणि उत्साहाचे वातावरण झाले आहे. बाळाराम म्हात्रे यांना २०८०० मते मिळाली असून शेकापच्या पाटील यांना ९५०० मतेचं मिळाली आहेत. त्यामुळे ११,३०० मते जास्त पटकावून म्हात्रेंनी आपला विजय नोंदवला. याबाबत विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, या विभागात आपल्यापैकी शिक्षकच आमदार असावा अशी मतदारांची इच्छा होती, आपले प्श्न मांडेल, अशी व्यक्ती तिथे हवी असे मतदारांचे म्हणणे होते.

शिक्षकांच्या ३३ संघटनांनी आपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विजय सोपा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा विजय मिळाला आहे. शिवाय, कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि हा विजय मिळवून दिला.  या पहिल्याच विजयामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडून पेढे वाटप सुद्धा केले आहे. त्याचवेळेस जास्त मतांनी पराभव झाल्यामुळे शेकापच्या कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे.

कोण आहेत म्हात्रे ?

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात गेल्या निवडणुकीत म्हात्रे हे सहा हजारांहून अधिक मते मिळवणारे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. यावर्षी भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांच्या विजयामुळे भाजप ने आपले खाते उघडले. ज्ञानेश्वर म्हात्रे हे बदलापूरचे रहिवासी असून ते शिवभक्त विद्यामंदिर शाळेचे संचालक असून मुख्याधापक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय अंबरनाथ सिन्ड्रेला इंग्लिश स्कूल , शंभूराजे प्राथमिक विद्यामंदिर , एम. के. पाटील विद्यामंदिर या शाळांमध्ये ते संचालक म्हणूनही काम बघतात. म्हात्रे यांना शिवसेनेची पार्श्वभूमी असून त्यांचे भाऊ वामन म्हात्रे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे शहरप्रमुख असून यापूर्वी त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली आहे.

२०१७ साली कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे रिंगणात होते शिक्षक सेनेच्या माध्यमातून २०१७ साली त्यांना सहा हजार ८८७ इतकी मते मिळाली. त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता तरी ते दुसऱ्या स्थानावर होते. पण आजच्या यशानंतर त्यांनी आपला जनसंपर्क वाढवून आपला मतदार संघ पिंजून काढला. आपल्या प्रचारात सातत्य ठेऊन भाजपाला विजयी करून त्यांनी स्वतःचे स्थान सुद्धा निर्माण केले.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

कोकण शिक्षक मतदारसंघाची २०१७ वर्षात झालेल्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांना ६ हजार ८८७ इतकी मते मिळाली होती. पराभव झाला असला तरी ज्ञानेश्वर म्हात्रे दुसऱ्या स्थानी होते. मात्र त्यानंतर म्हात्रे यांनी आपली जनसंपर्क मोहीम राबवली. तब्बल सहा वर्षे म्हात्रे यांनी शिक्षक सेना आणि राज्य मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून कोकण विभाग पिंजून काढला. या काळात शिक्षक मतदारांची नोंदणीही म्हात्रे यांनी करून घेतली.

मधल्या काळात इतर उमेदवारांपेक्षा म्हात्रे यांनी आपल्या प्रचारात सातत्य ठेवले. त्यात भाजपची ही फळी या काळात मागे पडली. नियोजनबद्ध कार्यक्रमाचा अभाव आणि मतदार नोंदणी मागे पडलेल्या भाजपाकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते. २०१७ या वर्षात झालेल्या कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा विजय झाला होता. त्यावेळी पाटील यांना ११ हजार ८३७ मते मिळाली होती. तत्कालिन आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू या दोन उमेदवारांमुळे ठाणे जिल्ह्यातील मतांमध्ये फुट पडली. त्याचा थेट फायदा बाळाराम पाटील यांना झाला. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला असे बोलले जाते. बाळाराम पाटील यांच्याशी लढत देण्याकरिता तेवढाच तगडा उमेदवार रिंगणात असावा या हेतूने भाजप व शिंदे गटाने आर्थिकदृष्ट्या तगड्या म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा