36 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरराजकारण“पूर्वी मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची; आता रडगाणी ऐकू येतात”

“पूर्वी मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची; आता रडगाणी ऐकू येतात”

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर सडकून टीका

Google News Follow

Related

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन भरवण्यात आलं असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जबरदस्त टीकास्त्र सोडले. या अधिवेशनाला शिवसेनेचे नेते, मंत्री, महिला आघाडी, युवा सेना सगळे उपस्थित होते. सगळ्यांना अयोध्येला घेऊन जाणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.

“शिवसेना आपण ताकदीने उभी करत आहोत. शिवसैनिकांमध्ये उत्साह तळपतो आहे. समाधानही आहे की, शिवसेना पक्ष पुढे जातो आहे आणि मोठा होतो आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे ही जमेची बाजू आहे. सत्यमेव जयते हे मी कायमच सांगत होतो. त्यामुळेच आपल्याला शिवसेना मिळाली आणि धनुष्यबाणही मिळाला. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वादही आपल्या पाठिशी आहे. शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही,” अशी घाणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

“महाविकास आघाडीत असताना बाळासाहेबांचे विचार मरु लागले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण होतं होते. नेतृत्व चुकत असल्याचे लक्षात आले होते. बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही पाऊल उचलले. आमचे पाऊल जर चुकले असते तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष जनतेने केला नसता. इतक्या मोठ्या संख्येने लोक या अधिवेशनाला आले नसते,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“अधिवेशनात शेतकऱ्यांचे, गरजूंचे ठराव घेतले. बाळासाहेब ठाकरे आणि कोट्यवधी हिंदूंचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सादर केला. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर राम मंदिर होताना, ३७० कलम हटताना त्यांनी पाहिलं असतं तर त्यांनीही नरेंद्र मोदींचे कौतुक केले असते. जे त्यांचा वारसा सांगतात त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही,” अशी सडकून टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.

“एखादा माणूस तुमच्याकडे असला की तो चांगला. त्याने तुमची साथ सोडली की तो गद्दार, तो कचरा असं तुम्ही त्याला संबोधता. एक दिवस हा महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही. लोक का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करणार की नाही?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

“सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. मी देखील मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर आहे कारण हे शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत. सर्वसामान्य माणूस जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला सामान्य माणसाच्या वेदना, कष्ट, समस्या त्याला माहित असतात,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“काहीही माहित नसताना लोक माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिले. सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतला कारण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत ठेवायचा होता. रोज आमच्यावर आरोप करत आहात, तुमच्यावरची संकटं एकनाथ शिंदेंनी छातीवर झेलली आहेत. मातोश्री हे बाळासाहेब असताना पवित्र मंदिर होतं. आता ती उदास हवेली झाली आहे. मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची तिथून आता रडगाणी ऐकू येतात, शिव्याशाप ऐकू येतात. रोज सांगायचं बाप चोरला, बाप चोरला. बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकट्या दुकट्याची मक्तेदारी नव्हती. बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकलंत. सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि आचार सोडले,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.

हे ही वाचा:

युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात

शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळून आठ जण जखमी

“महाराष्ट्रात जिथे जातो तिथे हजारो लोक रस्त्य्याच्या दुतर्फा थांबतात. आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर लोक आमच्यासाठी का थांबले असते. कुणाचंही प्रेम आणि आपुलकी पैसे देऊन विकत घेता येत नाही. हे प्रेम वागण्यातून, काम करण्यांतूनच मिळत आहेत. आधी म्हणता तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मग २०१९ ला काँग्रेसला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं. वीर सावरकरांचा भर सभागृहात अपमान झाला तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व?” असे तिखट सवाल एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा