32 C
Mumbai
Thursday, March 26, 2026
घरक्राईमनामानवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?

नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरू आहे. सकाळी ७.४५ वाजल्यापासून मलिक यांच्या चौकशीला सुरुवात झाली असून मुंबई येथील ईडी कार्यालयात त्यांना आणण्यात आले आहे.

बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० वाजता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या मुंबई येथील निवास्थानी दाखल झाले. त्यानंतर नवाब मलिक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. गेल्या तब्बल दोन तासांपासून मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे.

कुर्ल्यातील एक मोक्याची जमीन तुटपुंज्या किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर केला होता. कुर्ल्यातील तब्बल तीन एकर जागा अवघ्या तीस लाखात नवाब मलिक यांनी विकत घेतली. या खरेदी विक्रीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावे दिले होते. याच व्यवहारासंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी सध्या सुरू असण्याची शक्यता वर्तवली जाते.

हे ही वाचा:

‘दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल’

हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार

मुख्यमंत्री महोदय, कळकळीची विनंती!!! यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका…

‘समीर वानखेडे बार परवाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी घाई कशाला?’

तर या चौकशीनंतर नवाब मलिक यांना सोडले जाणार की मलिक यांना अटक केली जाणार? याविषयी राज्यात चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईतील ईडी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा पथकाचे जवानही याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. मलिक यांच्या अटकेची बातमी कळताच मलिक यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या घराशी जमायला सुरुवात झाली असून ईडी कार्यालयाला घेराव घालण्याची भाषा त्यांच्याकडून केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा