28.3 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणएकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ शिवसेना आमदार, यादी जाहीर

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ शिवसेना आमदार, यादी जाहीर

Google News Follow

Related

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे अनेक शिवसेना आणि अपक्ष आमदारांसोबत प्रथम सुरत त्यांनतर गुवाहाटीला गेले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सध्या एकनाथ शिंदे आमदारांसोबत गुहावाटीला आहेत. दरम्यान, जेव्हापासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. तेव्हापासून त्यांच्यासोबत किती आमदार आहेत याचे तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र आता खुद्द एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची यादी जाहीर केली आहे.

एकनाथ शिंदेंसह ३७ शिवसेनेचे आणि ९ अपक्ष आमदार गुहावाटीमध्ये आहेत. यामध्ये अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार नबी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, सौ. लता सोनावणे, प्रताप सरनाईक, सौ. यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, हे शिवसेनेचे आमदार आहेत. तर बच्चू कडू,राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर,चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार,सौ.मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, गीता जैन, हे अपक्ष आमदार नऊ शिंदे यांच्यासोबत आहेत.

हे ही वाचा:

… तर मविआतून बाहेर पडू- राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जर्मनी, युएई दौऱ्यावर

मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत

शिवसेनेकडे उरले फक्त १४ आमदार

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रथम तेरा असल्याचे म्हटले जात होते. त्यांनतर २५ असल्याचे सांगितले मग आजच्या दिवशी खुद्द एकनाथ शिंदेंनी आमदारांची नाव जाहीर केली आहेत. त्यांनी असंही सांगितले या यादीत अजून भर पडेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा