29 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरराजकारणएकनाथ शिंदेंची अधिवेशनात तुफान फटकेबाजी; विरोधक क्लीन बोल्ड

एकनाथ शिंदेंची अधिवेशनात तुफान फटकेबाजी; विरोधक क्लीन बोल्ड

विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर बोचरी टीका

Google News Follow

Related

विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला करत समाचार घेतला. यंदाचे हिवाळी अधिवेशन शेतकरी नुकसान भरपाई, ड्रग्ज, गुन्हेगारी, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवरून गाजले. दरम्यान, अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता घोटाळ्यांची यादीच मांडली. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याचे म्हणत सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले. तपासामध्ये सगळं बाहेर येणार असून विथ प्रुफ सर्व बाहेर येणार असल्याचा इशाराचं त्यांनी विरोधकांना दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “कोरोनाच्या काळात भीतीच्या वातावरणात लोक जगत असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरू होता. कफनचोर, खिचडी चोर असा बिरुद देखील कमी पडतील.”

“विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला. त्यात प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या. विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कदाचित महाविकास आघाडीचे सगळे वरीष्ठ नेते दिल्लीत जागावाटपाच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल. शिवाय दिशा सालियान प्रकरणात काही सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं. जलयुक्त शिवार योजनेवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण तीच योजना अनेक भागांमध्ये राबवण्याची मागणी केली गेली. त्यावरून विरोधी पक्ष किती गोंधळलेला आहे हे दिसतंय. वस्तूस्थिती जाणून घेऊन आरोप करायला हवेत. आरोपाला आरोप करण्यात अर्थ नाही,” अशा शेलक्या शब्दांत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला

ऑक्सिजन प्लांटमध्ये ही भ्रष्टाचार झाला. ऑक्सिजन प्लांटची सुरुवात झाली कपड्याच्या दुकानतून, रोमिन छेडा नावाच्या व्यावसायिकेचा गंजलेला ऑक्सिजन प्लांट दिल्याने फंगसचा प्रादुर्भाव झाला. त्यात काही लोकांचा जीव गेला. काहींच्या डोळ्यांना त्रास झाला. हे सर्व रेकॉर्डवर असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वीच्या सरकारचा केवळ पैशाशी मतलब होता असे ते म्हणाले. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

सबका एकही मालिक, सब का मालिक एक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले की, “रोमिन छेडा हा त्यांचा प्यादा आहे. पहिले तर हायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिले. पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही देण्यात आले. एकही मालिक आणि सब का मालिक एक, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. अनेकदा एक एक महिन्याचे काम दाखवून सातत्याने काम देण्यात आले.  या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम दिले. त्याशिवाय फिल्टर पंप आणि अनेक कामे देण्यात आली, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला. ही कंपनी काय काय करते याची जंत्री फार मोठी आहे. माझे डोके गरगरायला लागले, असा टोमणाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला.

मविआ म्हणजे टेंडर तिथे सरेंडर

यापूर्वीचे सरकार म्हणजे टेंडर तिथे सरेंडर, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. कोविड काळात सर्वसामान्य मुंबईकर आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर आपल्या स्वकीयांच्या घरी, बाकी जनता फिरते दारोदारी अशी अवस्था होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर केली.

सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे बोगस रुग्ण आणि औषधे दाखवण्यात आली. महापालिका तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे. या सगळ्याबाबतची माहिती घेतली आहे. त्यामुळे आरोप करताना विचार करा, नाहीतर याहून अधिक पोतडीत असल्याचा सूचक इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

अरेबियन नाईट्ससह पर्शियन नाईट्सच्या सुरस कथा

कोविड काळात खिचडी वाटपाचा निर्णय घेण्यात आला. पण, ३०० ग्रॅम ऐवजी १०० ग्रॅमचं खिचडी दिली गेली. गोरगरिबांच्या तोंडातील २०० ग्रॅम खिचडीचा घास हिरावून स्वतःची तुंबडी यांनी भरली. कुणाच्या खात्यात किती पैसे हे आता उघड झाले आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सह्याद्री रिफ्रेशमेंट हे कदम आणि पाटकर यांच्याशी संबंधित आहे. पात्रतेसाठी दाखवलेले किचन हे पर्शियन दरबार हॉटेलच्या मालकाचे होते. त्या मालकाला माहितच नव्हते की आपले किचन खिचडी साठी दाखवले आहे. त्यामुळे अरेबियन नाईट्ससह यांच्या पर्शियन नाईट्सच्या सुरस कथाही पुढे आल्या आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

हे ही वाचा:

पुजाऱ्याच्या हत्येचे कारण झाले स्पष्ट…

पंजाबचा गँगस्टर अमृतपाल सिंगला पोलिसांनी घातल्या गोळ्या, दोन पोलीस जखमी!

संतापजनक! मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला ठोकल्या बेड्या

दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदींचे महत्त्वाचे विधान!

आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये घरात बसून एक नंबर कसे होतात असा सवाल करताना तो नंबर पुढून नाही, तर शेवटून होता अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा