29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरराजकारणपाच राज्यांमध्ये रॅली, रोड शोवर या तारखेपर्यंत बंदी

पाच राज्यांमध्ये रॅली, रोड शोवर या तारखेपर्यंत बंदी

Google News Follow

Related

देशातील पाच राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून या राज्यांमध्ये ३१ जानेवारीपर्यंत रॅली, रोड शो, सभा यावर बंदी घातली होती. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होणार असलेल्या पाच राज्यांमध्ये रॅली, रोड शो, सायकल मार्चवर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. ही बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली आहे.

पाच राज्यांत निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुक आयोगाने प्रथम १५ जानेवारी, २२ जानेवारी त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत रॅली, सायकल मार्च, रोड शोवर बंदी घातली होती.  ही बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली आहे. घरोघरी प्रचारासाठी फक्त पाच जणांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता घरोघरी प्रचारासाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. ११ फेब्रुवारीला पुन्हा एकदा कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निवडणुक आयोग रॅली, सायकल मार्च आणि रोड शोबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

हे ही वाचा:

हिंदुस्थानी भाऊ’गर्दी’ने आणला नाकात दम

अरेरे !! थ्रेशर मशीनमध्ये युवकाचा पाय अडकला आणि…

परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’

पुन्हा एकदा लघुग्रह पृथ्वीकडे झेपावला!

देशातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असताना निवडणूक आयोगाने उमेदवारांना थोडा दिलासा दिला आहे. खुल्या जागेत १ हजार लोकांच्या उपस्थितीत सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बंदिस्त जागेत ५०० जणांना परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रचार करावा असेही सांगण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा