26 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरराजकारण'निवडणुकीत घोळ झालाय, पण पुरावा नाही!'

‘निवडणुकीत घोळ झालाय, पण पुरावा नाही!’

जनसुराजचे नेते प्रशांत किशोर यांचा दावा

Google News Follow

Related

जन सुराजचे संस्थापक आणि माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अखेर मौन सोडले. त्यांच्या नव्या पक्षाला बिहार विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही, त्यानंतर त्यांनी बिहारच्या निवडणुकीत घोळ झाल्याचा दावा केला. मात्र याचे कोणतेही पुरावे त्यांच्या जवळ सध्या नसल्याचे त्यांनी मान्य केले.

राज्यभरातून प्रथमच निवडणूक लढवलेल्या त्यांच्या पक्षाला मिळालेला पराभव “चटका लावणारा” असल्याचे किशोर म्हणाले. तरीही, त्यांच्या मोहिमेला जमिनीवर चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मतदारांच्या मतदानाच्या वर्तनात आणि त्यांच्या संघाने घेतलेल्या जन संवाद मोहिमेतील प्रतिसादामध्ये मोठे विसंगती असल्याचे ते म्हणाले. “काहीतरी चुकले”, असा त्यांचा दावा.

“काही अदृश्य शक्ती काम करत होत्या”

“काही अशा शक्ती काम करत होत्या ज्या थांबविणे अशक्य होते. लोकांना फारसे माहिती नसलेल्या पक्षांना लाखो मते मिळाली. काही जण मला सांगत आहेत की, ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली असे म्हणून आवाज उठवा. हारल्यानंतर लोक असे आरोप करतात. माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. पण अनेक गोष्टी जुळत नाहीत. पहिल्या दृष्टीक्षेपात काहीतरी चुकीचे घडले असे वाटते, पण काय ते माहीत नाही,” असे किशोर यांनी इंडिया टुडे टीव्हीच्या व्यवस्थापकीय संपादक प्रीती चौधरी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

महिलांना पैसे वाटल्याचा एनडीएवर आरोप

किशोर यांनी एनडीएवर महिलांना पैसे वाटून मतदान प्रभावित केल्याचा गंभीर आरोपही केला. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये देण्यात आले. त्यांना सांगितले गेले की, हा दोन लाखांच्या पैशाचा पहिला हप्ता आहे. एनडीएला, नितीश कुमारांना मतदान केल्यास उरलेले पैसे मिळतील. देशात, बिहारमध्ये कधीही सत्ताधारी सरकारने पन्नास हजार महिलांना असा पैसा दिल्याचे मला आठवत नाही,” असे किशोर म्हणाले.

हे ही वाचा:

उकडलेली डाळ की फोडणीची डाळ?

भाजपाला सद्बुद्धी कोण देणार?

अयोध्येत धर्मध्वजेच्या पुनर्स्थापनेने सुख, शांतता आणि समृद्धीचे नवयुग

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसकडून हिंदू-मुस्लिम राजकारण

‘लालूंच्या जंगला राज’च्या भीतीने मतदार दूर झाले

जन सुराजविरुद्ध काम करणारा आणखी एक मोठा घटक म्हणजे ‘लालूंचे जंगलराज’ परत येईल या भीतीचे त्यांनी वर्णन केले. “शेवटच्या टप्प्यात मतदारांना वाटू लागले की जन सुराज सत्तेत येण्याच्या स्थितीत नाही. अशावेळी जर त्यांनी आम्हाला मत दिले आणि आम्ही जिंकू शकलो नाही, तर लालूंच्या जंगला राजला पुन्हा संधी मिळेल, अशी भीती त्यांना वाटली. त्यामुळे काही लोक दूर गेले,” असे किशोर म्हणाले.

“माझी राजकीय कारकीर्द संपलेली नाही”

टीकाकार त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे स्मृतिलेख लिहीत असल्याचे सांगितले असता किशोर यांनी प्रत्युत्तर दिले, “हेच लोक माझ्या विजयाच्या काळात टाळ्या वाजवत होते. जर ते आज माझा स्मृतिलेख लिहित असतील तर ते त्यांच्याबद्दल नाही, मी पुढे काय करतो याबद्दल आहे. मी यशस्वी झालो तर ते पुन्हा टाळ्या वाजवतील. ते आपले काम करत आहेत आणि मी माझे. मला टीका करणारेच माझ्याबद्दल सर्वात जास्त उत्सुक आहेत. याचा अर्थ मी अजून संपलेलो नाही. ‘अभी कहानी बाकी है’.”

जन सुराजचा निकाल: शून्य जागा, 2–3% मते

बिहारमधील २४३ पैकी २३८ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या जन सुराजला एकही जागा मिळाली नाही. पक्षाने अंदाजे २ ते ३ टक्के मते मिळवली. बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा