29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणवीजेचा धक्का!! मंत्री, खासदार, आमदारांची लाखोंची वीजबिले थकीत

वीजेचा धक्का!! मंत्री, खासदार, आमदारांची लाखोंची वीजबिले थकीत

Google News Follow

Related

एकीकडे महाराष्ट्रात वीजेची टंचाई जाणवत असताना आणि बिले न भरल्यामुळे शेतकऱ्यांची वीजतोडणी सुरू असताना महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यांची अव्वाच्या सव्वा वीजबिले मात्र थकित आहेत. जवळपास १ कोटीपेक्षा अधिकची बिले अद्याप भरलेलीच नाहीत. वीजेच्या टंचाईसाठी केंद्र जबाबदार आहे, असा ओरडा करणारे महाविकास आघाडीचे अनेक मंत्री स्वतः मात्र बिले भरताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना वीजेच्या प्रश्नावर केंद्राला जबाबदार धरण्याचा हक्क तरी आहे का, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये विचारला जात आहे.

जवळपास ७२ मंत्री, आमदार, खासदार यांची बिले थकित असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे ऊर्जा विभाग डबघाईला आलेला आहे. काही दिवसांचा कोळसा शिल्लक असल्याची माहिती नियमितपणे समोर येत असते. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार २५ हजार, आरोग्यमंत्री राजेश टोपे ४ लाख, गृहमंत्री वळसे पाटील ३ हजार ५४१, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात १० हजार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २ लाख ६३ हजार, विश्वजीत कदम २० हजार, संभाजी राजे १ लाख २५ हजार, भाजपाचे जयकुमार गोरे ७ लाख, सुभाष देशमुख ६० हजार, सध्या तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख २ लाख २५ हजार, समाधान आवताडे २० हजार, राजेंद्र राऊत ३ लाख ५३ हजार, खासदार रावसाहेब दानवे ७० हजार, बबनराव शिंदे व त्यांचे बंधू संजय शिंदे यांच्या २२ वीजजोडण्या असून त्यांचे ७ लाख ८६ हजार थकीत आहेत.

 

हे ही वाचा:

दिल्ली, पंजाब, हरयाणा पोलिसांच्या तावडीत सापडले भाजपा प्रवक्ते ताजिंदर बग्गा

पूनावाला यांनी हनुमानचालिसा म्हणत शिवसेना, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची केली गोची

‘न्यायालयाने केला ठाकरे सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा पर्दाफाश केला’

गांजा है पर धंदा है ये…

 

त्याशिवाय, संग्राम थोपटे १ लाख, वैभव नाईक २ लाख, खासदार रजनी पाटील ३ लाख, संदीप क्षीरसागर २ लाख, आशीष जैस्वाल ३ लाख, सुरेश खाडे १ लाख ३२ हजार अशा रकमा अद्याप थकीत आहेत. ही वीजबिले ३० एप्रिल २०२२पर्यंतची असून एकूण १ कोटी २७ लाखांची थकबाकी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा