31 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामामाजी खासदार पप्पू यादव यांना अटक

माजी खासदार पप्पू यादव यांना अटक

Google News Follow

Related

बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांनी ही कारवाई केलीय. पप्पू यादवविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पप्पू यादव यांनी भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या गावाजवळ डझनभर रुग्णवाहिका पकडल्या होत्या. खासदार निधीतून या सर्व रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या. पप्पू यादव यांच्यावर सरकारी संपत्तीचं नुकसान करणं आणि कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, पप्पू यादव यांनी आजच आणखी एक ट्विट केलं होतं. “कोरोना काळात जर जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत करणं गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री साहेब मला फाशी द्या किंवा जेलमध्ये पाठवा. झुकणार नाही, थांबणार नाही. लोकांना वाचवणार, बेईमानांचा पर्दाफाश करणार”, असं पप्पू यादव म्हणाले.

पप्पू यादव यांच्यावरी आरोपानुसार, त्यांनी लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करत, अमनौर इथे जाऊन, विश्वप्रभा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेची पाहणी केली होती. एफआयआर  नुसार पप्पू यादव उर्फ राजेश रंजन ७ मे रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णवाहिका पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कोरना नियमांचं उल्लंघन केलं. इतकंच नाही तर त्यांनी रुग्णवाहिकांची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, पप्पू यादव यांनी अचानक भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या गावी धाड टाकली होती. तिथे डझनभर रुग्णवाहिका उभ्या असल्याचं दिसलं. लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसताना, इतक्या रुग्णवाहिका उभ्या असल्याने पप्पू यादव यांनी राडा केला होता. या रुग्णवाहिका खासदार निधीतून खरेदी केल्या होत्या. त्यातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे ही वाचा:

मुंबईतील रुग्ण पुण्यात पाठवणे हेच मुंबई मॉडेल?

अनिल देशमुख प्रकरण आता ‘ईडी’कडे

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

जी-२३ पुन्हा आक्रमक?

पप्पू यादवच्या आरोपांवर राजीव प्रताप रुडी यांनी उत्तर दिलंय. ड्रायव्हर उपलब्ध नसल्याने या रुग्णवाहिका इथे उभ्या असल्याचं रुडी म्हणाले. यानंतर पप्पू यादव यांनी ट्विट करत, एका दिवसात मी सर्व रुग्णवाहिकेवर ड्रायव्हरची व्यवस्था करु शकतो असं म्हटलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा