28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणमंत्रिमंडळ विस्तारावर फडणवीस यांनी दिलं हे उत्तर

मंत्रिमंडळ विस्तारावर फडणवीस यांनी दिलं हे उत्तर

Google News Follow

Related

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या यावेळी दोन्ही नेत्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले. माध्यमांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वृत्तही आले. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत मोठे विधान केलं आहे. अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारांवर चर्चा झाली नाही. परंतु, आम्ही योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केलं आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मंत्री मंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर माध्यमांनी मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या संभाव्य आमदारांची यादीही प्रसिद्ध झाली . परंतु उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारांवर चर्चा झाली नाही असे सांगून तूर्त या चर्चेवर पडदा टाकला आहे.

हे ही वाचा:

लखनौमध्ये पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळली .. अनेक ढिगाऱ्याखाली अडकले

अंधश्रद्धेतून सात जणांचे भयंकर हत्याकांड,

बीबीसी माहितीपटाच्या विरोधानंतर अनिल अँटनी यांचा काँग्रेसला रामराम

“जग बदलण्याची ताकद फक्त एका मतात”

आमदार संतोष बांगर प्रकरणावर भाष्य करतांना. मला आता त्याची माहिती नाही. माहिती घेऊन कारवाई करू असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकांसंदर्भात बोलतांना फडणवीस म्हणाले , महाराष्ट्रात एक परंपरा आहे. एखाद्या सदस्याचं निधन होतं. तेव्हा सर्वजण सहकार्य करतात. ती निवडणूक बिनविरोध होते. याचं उदाहरण आपण मुंबईत पाहिलं. मुंबईची निवडणकू बिनविरोध करण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतर आम्ही माघार घेतली. हीच परंपरा सर्वांनीच पाळली पाहिजे. जपली पाहिजे, असं ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा