25 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरक्राईमनामालखनौमध्ये पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळली .. अनेक ढिगाऱ्याखाली अडकले

लखनौमध्ये पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळली .. अनेक ढिगाऱ्याखाली अडकले

Google News Follow

Related

लखनऊमध्ये पाच मजली अपार्टमेंट इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ३० पेक्षा जास्त रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस, अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बचावकार्य केले आहे. घटनास्थळीआतापर्यंत १४ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचा बचाव पथक प्रयत्न करत आहे.

इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर सात जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. इमारत पडल्यानंतर घटनास्थळी घबराटीचे वातावरण आहे. बचावासाठी अडकलेल्या रहिवाशांचा आरडाओरडा सुरु आहे.  जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका कमी पडत आहे.

हजरतगंजमधील वजीर हसन रोडवर बांधलेली ही इमारत २०१० मध्ये यजदान बिल्डर्सने बांधली होती. अनेक दिवसांपासून इमारतीच्या तळघरात काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे तीन फुटांपर्यंत तळघर खोदण्यात आले. संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता लखनौला जाणवलेल्या सौम्य भूकंपाने इमारत कोसळली.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

या पाच मजली इमारतीत १६-२० फ्लॅट आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. संध्याकाळी बहुतेक लोक घरी होते. त्यामुळे ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात लोक दबले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीमध्ये काही कुटुंबे राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंधित असल्याचे सांगितल्या जात आहे. या इमारतीत काँग्रेस नेते झीशान हैदर आणि सपा नेते अब्बास हैदर यांचे कुटुंबीयही राहतात. सपाचे प्रवक्ते हैदर अब्बास यांची आई बेगम अमीर हैदर आणि पत्नी उजमा ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. वडील अमीर हैदर आणि मुलगा मुस्तफा यांना सुखरूप बाहेर काढले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,923चाहतेआवड दर्शवा
1,994अनुयायीअनुकरण करा
61,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा