27.5 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरराजकारणजाणून घ्या तुमच्या नेत्याला'

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

पंतप्रधानांनि साधला ८० तरुणांशी संवाद

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जाणून घ्या तुमच्या नेत्याला ‘ या कार्यक्रमांतर्गत देशभरातून निवडलेल्या एकूण ८० तरुणांशी आज समोरासमोर बसून संवाद साधला.या संवादात पंतप्रधानांनी २४ जानेवारी रोजी संभाषणाचा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला असून पंतप्रधानांना भेटण्याची आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून त्यांच्याशी संवाद साधण्याची अनोखी संधी मिळाल्याने तरुणांनी आनंद व्यक्त केला आहे.

काय आहेत कार्यक्रमाचे ठळक मुद्दे
‘नो युवर नेता’ कार्यक्रमाचा भाग म्हणून २३ जानेवारी रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवडलेल्या तरुणांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी तरुणांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील विविध पैलूंवर आणि त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो यावर विस्तृत चर्चा केली.आणि मोकळेपणाने संवाद साधला.

आपल्या आयुष्यात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले आणि त्या आव्हानांवर तुम्ही त्यावर कशी मात करावी हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे चरित्र वाचण्याचा सल्लाही यावेळेस पंतप्रधानांनी दिला. पंतप्रधानांना भेटण्याची आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसण्याची अनोखी संधी मिळाल्याने तरुणांनी आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून  ८० तरुणांचा एवढ्या लोकांच्या उपस्थितीने विविधतेत एकता म्हणजे काय ते समजून घेण्याची संधीही यावेळी अनेकांना मिळाली असल्याचे ते म्हणाले.या कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांनी आपलेही अनुभव कार्यक्रमात शेअर केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा