31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारणतुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, मुंबई नाही आणि मराठी नाही!

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, मुंबई नाही आणि मराठी नाही!

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांनी केला मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक प्रश्न उपस्थित केले. आपण विचारलेल्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी उत्तरेच दिली नाहीत, असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले की, आमच्यावर टीका करा, पण महाराष्ट्रावर टीका करू नका असे म्हणता पण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, मुंबई नाही आणि मराठी नाही.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर फडणवीसांनी या भाषणावर तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, आम्ही विविध घोटाळ्यांबाबत उत्तरे मागितली पण मुख्यमंत्र्यांनी एकाचेही उत्तर दिले नाही. त्यांचे भाषण हे शिवाजी पार्कमध्ये केलेल्या भाषणासारखे होते.

फडणवीस म्हणाले की, सध्या युक्रेन आणि रशियाचे युद्ध चालले आहे. झेलेन्स्की नाटोची मदत मागत आहेत. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर बरे झाले असते. मुख्यमंत्र्यांकडे असा बॉम्ब आहे तो सर्वात भारी आहे. तो आहे टोमणे बॉम्ब. टोमण्यांच्या व्यतिरिक्त काय आहे त्यात. की हे अरण्यरुदन होतं. लगता है बडी चोट खाई है.

फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले की, मलिकांचं समर्थन उद्धव ठाकरे करतात, याचे मनापासून दुःख आहे. सत्ता चालवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, पण पण नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून, दाऊदच्या माणसाकडून जमीन खरेदी करणे योग्य नाही. इतकी वर्षे सोबत राहिलो त्यामुळे हे दुःख होते आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू होणार!

‘कोरोना काळात शालेय शिक्षणासाठी फी कमी न करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य’

मिलिंद खेतले यांना राष्ट्रपती वैशिष्टपुर्वक सेवा पदक

उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?

 

काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाशी भाजपाच्या झालेल्या युतीचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. त्यावरही फडणवीस बोलले. ते म्हणाले की, अफझल गुरूसारख्या आरोपीला फाशी देऊ नका म्हणणारे आज तुमच्यासोबत आहेत. ज्यावेळेस काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी सांगितले, आयएसआयने सांगितले निवडणुका होऊ देणार नाही.तेव्हा निवडणुका घेतल्या गेल्या. ६० टक्के मतदान झाले काश्मीरमध्ये. सरकार बनू देणार नाही, म्हटले गेले त्यावेळी देशाची आवश्यकता होती म्हणून मुफ्तींसोबत सरकार बनवले. पण इथे निवडणुका होऊ शकतात हे स्पष्ट झाल्यावर सरकारला लाथ मारली.

मुख्यमंत्र्यांनी शिखंडीचा उल्लेख केला. मला सांगा मोदींसोबत आपण मते मागितली पण सत्तेसाठी कुठल्या शकुनीसह लागलात. शिखंडीला पुढे करणारी ही औलाद नाही समोर लढणारे लोक आहोत. प्रभू रामचंद्र, श्रीकृष्णाचे नाव सांगतो.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा