34 C
Mumbai
Sunday, February 15, 2026
घरराजकारणचित्रपट तिकिटांबद्दल प्रश्न विचारणाऱ्या जया बच्चनना अर्थमंत्री सीतारमण यांनी सुनावले

चित्रपट तिकिटांबद्दल प्रश्न विचारणाऱ्या जया बच्चनना अर्थमंत्री सीतारमण यांनी सुनावले

दोघींमधील संवादाचा व्हीडिओ झाला व्हायरल

Google News Follow

Related

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री ते राजकारणी बनलेल्या जया बच्चन यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांच्या दोघींमधील तीव्र शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

ही घटना तेव्हा सुरू झाली जेव्हा जया बच्चन यांनी मनोरंजन क्षेत्रावरील अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान निर्मला सीतारामन यांच्या उत्तरात हस्तक्षेप केला. जया यांनी मंत्रीमहोदयींवर टोला लगावत त्यांना “उत्तम कथाकथन करणाऱ्या” असे संबोधले आणि वाढत्या करभारामुळे चित्रपटांच्या तिकिटांच्या किंमती वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला.

राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन म्हणाल्या, “आपण खूप चांगली उत्तरे दिलीत. आपण एक उत्तम कथाकथन करणाऱ्या आहात. आमच्यासाठी छान मनोरंजन केलेत. पण मी मनोरंजन उद्योग आणि वाढत्या तिकिटांच्या दरांबद्दल बोलत आहे. आम्ही सर्वाधिक कर भरणाऱ्या उद्योगांपैकी एक आहोत.”

हे ही वाचा:

14 feb 2026

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

रिलायन्सला अमेरिकेकडून व्हेनेझुएलाचे तेल खरेदीची परवानगी

डोनाल्ड ट्रंपचा इराणला पुन्हा इशारा

त्यांच्या टीकेला उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की मनोरंजन कर आणि तिकिटांचे दर हे राज्य सरकारांच्या अखत्यारित येतात, केंद्र सरकारच्या नाहीत.

“जया बच्चन ज्या विशिष्ट मुद्द्याबद्दल बोलल्या की वाढत्या तिकिटांच्या दरांमुळे उद्योग अडचणीत आहे. पण त्याबाबत मी सांगू इच्छिते की मनोरंजन कर आणि तिकीट व्यवस्था हे राज्याच्या अखत्यारितील विषय आहेत. मला हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही,” असे वित्तमंत्र्यांनी सांगितले.

जया बच्चन यांनी हा मुद्दा उपस्थित करताना केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये मनोरंजन उद्योगासाठी काही सवलती किंवा प्रोत्साहन देण्यात आले आहे का, याची विचारणा केली होती.

या क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा दावा फेटाळताना सीतारामन म्हणाल्या की अर्थसंकल्पात सर्जनशील अर्थव्यवस्थेला “सातत्यपूर्ण प्राधान्य” देण्यात आले आहे, विशेषतः कौशल्य विकास आणि कंटेंट निर्मिती क्षेत्रात.

त्या म्हणाल्या, “अर्थसंकल्पात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कंटेंट निर्मितीला महत्त्वाचे विकास इंजिन म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सहाय्य जाहीर करण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षण देईल आणि १५०० शाळांमध्ये क्रिएटर लॅब स्थापन करेल. २०३० पर्यंत २० लाख व्यावसायिक तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कंटेंट निर्मिती हे अत्यंत कौशल्याधारित क्षेत्र आहे.”

तसेच डिझाइन, वेशभूषा, सेट आणि दृश्य सौंदर्यशास्त्र यांसारख्या विशेष कौशल्यांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या नवीन शाखा सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा