30.9 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरराजकारणसंविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

संविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Google News Follow

संविधानाचे रक्षण करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसनेच सत्तेत असताना संविधान कमकुवत करण्याचे काम केले. ज्या लोकांकडे संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी होती, त्यांनीच त्याला कमकुवत केले. विशेष म्हणजे, अशा लोकांकडेच पाच दशके देशाची सत्ता होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पहिली आणि ४२ वी घटनादुरुस्ती, आणीबाणी, कलम ३५६ चा गैरवापर आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० चा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसच्या राजवटीवर टीका केली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखातून त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.

घटनादुरुस्त्यांवरून काँग्रेसला लक्ष्य

१९५१ मधील पहिल्या घटनादुरुस्तीमुळे नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यांवर मर्यादा आणण्यात आल्याचा आरोप मोदी यांनी केला. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काही महिने आधी बहुमताच्या जोरावर ही घटनादुरुस्ती करण्यात आली होती. आणीबाणीच्या काळातील ४२ व्या घटनादुरुस्तीमुळे न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार मर्यादित झाला आणि घटनात्मक संस्थांमधील सत्तासंतुलन बदलले, असेही त्यांनी म्हटले. ३८ वी आणि ३९ वी घटनादुरुस्तीही तरुणांनी अभ्यासावी, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी कलम ३५६ चा जवळपास शंभर वेळा वापर करण्यात आल्याचा आरोपही मोदी यांनी केला. त्यांचा रोख काँग्रेस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे होता. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ मुळे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांच्या अधिकारांवर परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले.

ओबीसी आरक्षण महिला विधेयकावरून टीका

विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या पक्षाला ओबीसींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असल्याचा आरोप मोदी यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही अशा आरक्षणाला विरोध होता, असे ते म्हणाले. महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी मंजूर होऊ दिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारच्या योजनांचा उल्लेख

पंतप्रधान आवास, उज्ज्वला, आयुष्मान भारत, मुद्रा आणि पीएम स्वनिधी योजनांमधून सामाजिक व आर्थिक न्यायाला चालना मिळाल्याचे मोदी यांनी सांगितले. जागतिक बँकेच्या अहवालाचा हवाला देत जवळपास ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा दावाही त्यांनी केला. जीएसटी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण यांसारख्या घटनात्मक बदलांचा त्यांनी उल्लेख केला.

हे ही वाचा:

काश्मीरमधून गायब झालेले ३० जण पाकिस्तानात सक्रिय

अनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून शाहरुखची कायदेशीर नोटीस

हिंदूंना न्याय दिलात तर खबरदार…

उमर खालिद, शर्जिल इमामला जामीन नाही!

संविधानाची अद्ययावत आवृत्ती २२ भाषांमध्ये उपलब्ध करून देणे आणि भारतीय न्याय संहिता लागू करणे, हेही महत्त्वाचे निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले. नक्षलवादामुळे आदिवासी भागांतील नागरिक घटनात्मक अधिकारांपासून वंचित राहिल्याचा आरोप करत त्यांनी ‘वैचारिक नक्षलवाद्यां’वरही टीका केली. विरोधक आता ‘विरोधी पक्ष’ नव्हे, तर ‘अडथळा पक्ष’ बनल्याची टिप्पणी त्यांनी केली. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘देश प्रथम’ आणि ‘कर्तव्य’ या तत्त्वांचा अंगीकार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा