जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना ईडीकडून समन्स

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना ईडीकडून समन्स

Jammu & Kashmir, Oct 15 (ANI): National Conference president Farooq Abdullah addresses media after the all-party meeting, at his residence in Srinagar on Thursday. (ANI PHOTO)

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांना दुसरं समन्स पाठवलं आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (JKCA) कथीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आलं आहे. ३१ मे पर्यंत फारुख अब्दुल्ला यांना ईडीसमोर हजर राहावं लागणार आहे.

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी यावर्षी मार्च महिन्यात ईडीकडून फारुख अब्दुल्ला यांची ७.२५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. याच प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वीही ईडीने त्यांना समन्स पाठवले होते. मात्र, समन्सवेळी ते हजर राहू शकले नव्हते म्हणून ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावलं आहे.

हे ही वाचा:

आर्यन खान सह ६ जणांना ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट

‘रिसॉर्ट परबांचे नाही मग त्यांनी कर का भरला?’

स्टेडियममध्ये कुत्रा फिरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला पाठवले लडाखला

अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

ईडीने अब्दुल्ला यांना समन्स बजावलं असल्याचं नॅशनल कॉन्फरन्सनं शुक्रवारी ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे. जेकेसीएला दिलेल्या अनुदानाबाबत हा घोटाळा असून सन २००२ ते २०११ मध्ये ४३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हा घोटाळा ५० कोटी रुपयांचा असल्याचा दावा आता ईडीने केला आहे. तसेच जेकेसीएचं सध्या बँक अकाऊंट असताना सहा नवे बँक अकाऊंट उघडण्यात आले आहेत. जेकेसीएच्या पार्किंगमधून मिळणाऱ्या पैशासाठी हे आकाऊंट उघडण्यात आलं आहे. तसेच पार्किंगचे पैसे ठेवण्यासाठी आणखी एक अकाऊंट जे जेकेसीएच्या काश्मीर विंगसाठी उघडण्यात आलं आहे.

Exit mobile version