30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारण'रिसॉर्ट परबांचे नाही मग त्यांनी कर का भरला?'

‘रिसॉर्ट परबांचे नाही मग त्यांनी कर का भरला?’

Google News Follow

Related

भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे समोर आणत असतात. आज २७ मे रोजी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर टीकेची तोफ डागली. ईडीने काल, २६ मे रोजी अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर धाड टाकली. यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रिसॉर्टमधील सांडपाणी संबंधित चौकशी असून यात मनी लॉन्ड्रिंगचा काहीही संबंध नाही. यावरून किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

अनिल परबांचा ७/१२ बाहेर काढणारच असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. मराठीत एक प्रसिद्ध नाटक आहे. ‘तो मी नव्हेच’ असे अत्रे यांचे नाटक आहे त्याप्रमाणे अनिल परब यांची तो मी नव्हेच अशी नौटंकी चालू आहे असा टोला किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना लगावला आहे. अनिल परब म्हणतात की दापोलीमधल्या रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही. मग त्यांनी कर का भरला? असा सवाल करत किरीट सोमय्या यांनी काही कागदपत्रे दाखवली.

डिसेंबर १७, २०२० सालची मुरुड ग्रामपंचायतीची पावती किरीट सोमय्या यांनी दाखवली. मालमत्तेचा कर भरल्याची ही पावती आहे. तसेच २०१९ नोव्हेंबर- डिसेंबर महिन्याची घरपट्टी, दिवाबत्ती कर अनिल परबांनी भरल्याची पावती किरीट सोमय्या याई दाखवली. ही मालमत्ता तुमची नाही मग कर का भरता? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यांचे नाटक केले आणि आता अनिल परब या रिसॉर्टचे नाटक करत आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी २०२० चा अनिल परबांचे नाव आणि फोटो असलेला महावितरणाला केलेला अर्जही दाखवला. उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा:

स्टेडियममध्ये कुत्रा फिरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला पाठवले लडाखला

अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भारतातील सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उदघाटन

आता यशवंत जाधव यांची सुरुवात झाली आहे. काल प्रधान डीलर या विरोधात कंपनी मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या पूर्ण परिवार विरोधात कारवाई सुरू झाली आहे. त्यांनतर उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा नंबर लागणार आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा