30 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरक्राईमनामाअभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

Google News Follow

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कृत्यांनी डोकं वर काढलेलं असताना सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. टीव्ही कलाकार अमरीन भट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत ही घटना घडवून आणणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हत्येनंतर सुमारे दोन दिवसांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

३५ वर्षीय टीव्ही कलाकार अमरीन यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पुतण्यालाही गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची हत्या झाल्यापासून सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता.

सर्व ठिकाणांहून दहशतवाद्यांची गुप्त माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर हे दोन्ही दहशतवादी अवंतीपुरा भागात लपून बसल्याचं समोर आले. सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले.

हे ही वाचा:

मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भारतातील सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उदघाटन

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान

अमेरिकेच्या कानशिलावर ‘बंदूक’!

बडगाममध्ये गेल्या काही दिवसांत झालेली ही सलग दुसरी हत्या होती. त्यामुळे लोकांचा संताप वाढला होता. तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सुरक्षा दलांनी विशेष मोहीम राबवून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आणि अमरीनला ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा