34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणमहाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेमधून ६ जुलै २०२२ ते २१ जुलै २०२२ या कालावधीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश, आणि बिहार यह राज्यांसाठीही हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या ३० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. त्या जागा भरण्‍यात येणार आहेत.

सदाशिव रामचंद्र खोत, सुजितसिंह मानसिंह ठाकूर, प्रवीण यशवंत दरेकर, सुभाष राजाराम देसाई, रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, संजय पंडितराव दौंड, विनायक तुकाराम मेटे, प्रसाद मिनेश लाड, दिवाकर नारायण रावते या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. तर रामनिवास सत्यनारायण सिंह यांची जानेवारी पासून रिक्त असलेली जागासुद्धा याचवेळी भरली जाणार आहे.

हे ही वाचा:

अनिल परबांवर ईडीची धाड! सात ठिकाणी छापेमारी, गुन्हासुद्धा दाखल

यासिन मलिकला जन्मठेप

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर

आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले

या निवडणुकीसाठी अधिसूचना २ जून २०२२ रोजी जारी करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख ९ जून २०२२ पर्यंत आहे. अर्जांची छाननी १० जून २०२२ रोजी होणार असून, १३ जून २०२२ पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान २० जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणाार असून त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा