नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानसह इतर सहा जणांना देखील क्लीनचिट देण्यात आली आहे.
कॉर्डिलिया क्रूझवर केलेल्या कारवाईत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कारवाई करून आर्यन खान सह १४ जणांना ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यन खानला आणि त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांना एनसीबीने चौकशीदरम्यान गेल्या वर्षी अटक केली होती. त्यावेळी चार आठवडे आर्यन खान तुरुंगात होता. ३० ऑक्टोबर रोजी तो तुरुंगातून बाहेर आला होता.
हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर या गुन्ह्याचा तपासासाठी एनसीबी ने विशेष तपास पथक गठीत करून या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू केला होता. डायरेक्टर संजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता, विशेष पथकाच्या तपासात आर्यन खान सह सहा जणांकडे ड्रग्स मिळून आले नसल्याचे उघडकीस आले असून १४ जणांपैकी या सहा जणांना या प्रकरणात एनसीबने क्लीन चिट दिली आहे. आयर्न खान सह ६ जणांविरुद्ध दाखल केलेला गुन्ह्यातून या सहा जणांचे नावे वगळण्यात आली असल्याची माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा:
‘रिसॉर्ट परबांचे नाही मग त्यांनी कर का भरला?’
स्टेडियममध्ये कुत्रा फिरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला पाठवले लडाखला
अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा
मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त
छाप्याच्या वेळी, जहाजातून १३ ग्रॅम कोकेन,५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि रोख १ लाख ३३ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. या छाप्याच्या वेळी एकूण १४ जणांना अटक करण्यात आली. तथापि, काही साक्षीदारांनी केलेल्या खंडणीच्या दाव्यांमुळे या प्रकरणातील वाद अधिकच गडद झाला.