28 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारणतृणमूलच्या अत्याचारांविरोधात महिलांनीही ठोठावले कोर्टाचे दरवाजे

तृणमूलच्या अत्याचारांविरोधात महिलांनीही ठोठावले कोर्टाचे दरवाजे

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये मतदानानंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांचा खून करण्यात आला. घडलेली घटना सांगण्यासाठी पुढे आलेल्या महिलांवर सत्ताधारी पक्षाकडून सामुहिक बलात्कार करण्यात आला. हा अतिशय भयानक असा प्रकार असून या सर्व घटनेची चौकशी आता एसआयटीच्या अंतर्गत केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांच्या खुनानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेतल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून बलात्कार झालेल्या महिलादेखील पुढे आल्या आहेत. आता पोलिसांची निष्क्रीयता आणि घडलेल्या हिसांचाराची चौकशी एसआयटी अंतर्गत होईल.

गोध्रा नंतरच्या जातीय दंगली प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या या कारवाईमुळे या महिलांना सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. त्यामुळेच टीएमसीच्या विजयानंतर राज्यात पंधरवडाभरात झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनांच्या न्यायालयीन देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी आता करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:

चिराग पासवान यांना मोठा धक्का

उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

जोकोविच सितसी’पास’; १९ वे ग्रँडस्लॅम जिंकले

भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेनंतर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने अराजकता माजवली त्याला काहीच तोड नाही.६० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना यावेळी घडली होती. अतिशय हिंस्त्र पद्धतीने कार्यकर्ते यावेळी वागले होते. केवळ इतकेच नाही तर या महिलेच्या सहा वर्षांच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार या महिलेने कथन केला.

अधिक बोलताना त्या म्हणाल्या, खेजुरी मतदारसंघातून भाजपाने विजय मिळविला होता. तरीही १०० ते २०० टीएमसी कार्यकर्त्यांनी घराला घेरून बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली. या घटनेमुळे घाबरून दुसर्‍या दिवशी त्या बाईची सून घरातून निघून गेली. त्यानंतरच्या मध्यरात्री पाच टीएमसी कार्यकर्त्यांनी संबंधित महिलेला घरात घुसून मारहाण केली. तिला पलंगाला बांधले आणि नंतर तिच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार केला. असा आरोप या महिलेने सुप्रिम कोर्टासमोर केला. दुसर्‍या दिवशी सकाळी बेशुद्ध अवस्थेत शेजार्‍यांनी तिला पाहिले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून नंतर त्या महिलेचा जावई एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांकडे गेला. परंतु पोलिसांनी मात्र टाळाटाळ केली असा आरोप आता या महिलेकडून करण्यात आलेला आहे. विजयानंतर झालेल्या हिंसाचारात टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार शस्त्र वापरले आणि बदला घेतला.

राज्य सरकारच्या अधिकारी आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे हे गुन्हे अगदी सहज लपवले गेले. स्थानिक पोलिसांच्या एकूणच मनोवृत्ती या घटनाक्रमावरून दिसून येते. बलात्काराच्या घटनेत सहभागी असलेल्या पाच जणांनी बलात्कार केला होता. हे आता वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट झालेले आहे. यावेळी पोलिसांनी एफआयआरमधील पाच आरोपींपैकी केवळ एकाच व्यक्तीचे नाव नोंदवले.

अनुसूचित जाती जमातीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीनेही तिच्यावर घडलेल्या प्रसंगाला वाचा फोडली आहे. ९ मे रोजी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक बलात्कार केला. तसेच तिला जंगलात तसेच सोडून दिले. त्यानंतर तिच्या कुटूंबियांनी तक्रार नोंदवू नये म्हणूनही त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. अशी माहिती सुप्रिम कोर्टात महिलेने दिलेली आहे. अधिक बोलताना ती म्हणाली, सध्या तिला बालकल्याण गृहात ठेवले असून, तिच्या पालकांना मात्र तिला भेटून दिले जात नाही. स्थानिक पोलिस आणि प्रशासन तिच्या कुटूंबावर दबावतंत्राचा वापर करीत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. अपराध आणि गुन्हेगारी घटनांची माहिती देतांना मिडिया ही आपल्या वैयक्तिक लाभाचा विचार करते हे समस्त पत्रकारितेच्या क्षेत्राला बदनाम करणारे आहे. काही बाबतीत गुन्हे घडल्याच्या बातम्या येतात पण पुढे त्या केस चे काय झाले हे कुणीचं सांगत नाही. सरकारी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. पोलीस, न्यायालये भ्रष्ट आहेत.. मिडिया ही पैशा मागे धावते. पैशाने हिरोला झिरो व झिरोला हिरो बनवते मग अशा जगात गोरगरिब सामान्य जनतेला न्याय कोण देणार.?
    जिसकी लाठी उसकी भैसं असेचं भारतात चालले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा