30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाउल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

Google News Follow

Related

गेल्या महिन्यात उल्हासनगरमध्ये एका बिल्डरवर सहा मजली इमारत कोसळल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एका १४ वर्षाच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू आणि दोन जखमी झाले आहेत. मनोज सेवकराम लाहोरी यांच्याविरूद्ध एफआयआर उल्हासनगर महानगरपालिकेच्या तक्रारीवर दाखल करण्यात आला आहे. बिल्डरने मोहिनी पॅलेस ही इमारत बेकायदेशीररित्या बांधल्याचा आरोप केला होता.

लाहोरी यांच्याविरूद्ध ३०४ कलमांतर्गत तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) कायद्यानुसार इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात उल्हासनगरमध्ये दोन इमारती कोसळून त्यात एकूण १२ लोक ठार झाले. या दोन्ही इमारती १९९४ ते १९९६ या दरम्यान बांधण्यात आल्या होत्या. मुख्य म्हणजे या इमारतींचा उल्लेश धोकादायक इमारतींमध्ये करण्यात आला नव्हता.

गेल्या महिन्यानंतर या परिसरातील जवळपास ५०० पेक्षा अधिक इमारतींच्या रहिवाशांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा सल्ला देण्यात आला. उल्हासनगरातील नगरपालिका आयुक्तांनी १९९४ ते १९९८ दरम्यान बांधकाम केलेल्या इमारतींचा विचार करण्यासाठी नेमलेल्या समितीने ही यादी तयार केली होती. या कालावधीत उल्हासनगरात बांधकामांची तेजी पाहायला मिळाली. समितीच्या अहवालानुसार यापैकी बहुतेक इमारती निकृष्ट दर्जाच्या वाळूने बनविलेल्या आहेत.

समितीने उल्हासनगरातील प्रत्येक पालिका प्रभागात अशा इमारतींची यादी दिली आहे. सर्वाधिक इमारती प्रभाग क्रमांक चारमध्ये असून या इमारतींची संख्या जवळपास १६० इतकी आहे. त्याखालोखाल प्रभाग दोनमधील १३३, प्रभाग तीनमधील ११८ आणि प्रभाग एकमधील ९४ इमारती आहेत.

हे ही वाचा:

विधानसभा निवडणूकही काँग्रेसने स्वबळावर लढवावी

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

…तर पुन्हा निर्बंध लावले जातील; वडेट्टीवारांची पुन्हा घाई

समितीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने लाहोरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. समितीला असे आढळले की, नोंदणी प्रक्रियेशिवाय या इमारती मधील फ्लॅट्स विकले गेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा