30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरदेश दुनिया१२ वर्षानंतर नेतान्याहू सत्तेतून बाहेर

१२ वर्षानंतर नेतान्याहू सत्तेतून बाहेर

Google News Follow

Related

नेफ्ताली बेनेट इस्राईलचे नवे पंतप्रधान

इस्राईलच्या संसदेने नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मंजूरी दिलीय. नेफ्ताली बेनेट यांनी ६० विरुद्ध ५९ मतांनी इस्राईलच्या संसदेत विश्वासमत ठराव जिंकला. यासह इस्राईलच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या बेंजमिन नेतन्याहू यांची सत्ता संपुष्टात आलीय. बेनेट यांनी बहुमत सिद्ध करत एका दशकानंतर बेंजमिन यांना सत्तेवरुन खाली खेचत वेगळ्या पक्षाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा केलाय. यामुळे इस्राईलच्या राजकारणातील बेंजमिन यांच्या पकडीला धक्का लागला आहे.

इस्राईलचे माजी पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू आंतरराष्ट्रीय राजकारणातही चांगलेच चर्चित नेते ठरले. ते आपल्या कार्यकाळात जागतिक राजकारणात चांगलेच सक्रीय असलेले दिसले. इस्राईलचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदाचा मान बेंजमिन यांनाच जातो. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर इतके वर्षे सत्तेत राहिलेल्या नेतन्याहू आणि त्यांचा लिकुड पक्षाला आता विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. बेंजमिन हेच लिकुड पक्षाचे विधीमंडळ नेते आणि संसदेचे विरोधी पक्षनेते असतील.

बेंजमिन नेतन्याहू यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरुन खाली येणं आवडलेलं दिसत नाही. त्यामुळेच बहुमत सिद्ध झाल्यानंतर सरकार अजून स्थापनही झालेलं नाही तेच नेतन्याहू यांनी सरकार पाडणार असल्याचा इशारा द्यायला सुरुवात केली. नेतन्याहू यांनी नव्या सरकारवर फसवणूक करुन युती केल्याचा आरोप केलाय.

हे ही वाचा:

उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

विधानसभा निवडणूकही काँग्रेसने स्वबळावर लढवावी

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

बहुमताआधी केलेल्या भाषणात इस्राईलचे होऊ घातलेले पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांनी कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले, “इराणसोबत आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र सामंजस्य करार करणं मोठी चूक आहे. इस्राईल इराणविरोधात कारवाई करण्यास सक्षम आहे. इस्राईल इराणला अण्वस्त्र बाळगण्यास परवानगी देणार नाही. आम्ही या कराराचा भाग नसू. तसेच त्यावर कारवाई करण्याचं आमचं स्वातंत्र्य आमच्याकडे असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा