27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरराजकारणगोव्याच्या मंत्रिमंडळात आता झाले १२ मंत्री

गोव्याच्या मंत्रिमंडळात आता झाले १२ मंत्री

Related

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांच्यासह आणखी तीन आमदारांचा मंत्री म्हणून समावेश करून मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी तीन नवीन मंत्र्यांना पदाची शपथ दिली आहे.

एमजीपीच्या ढवळीकर यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार नीलकांत हलर्णकर आणि सुभाष फळदेसाई यांनीही शपथ घेतली आहे. राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी २८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अन्य आठ मंत्र्यांसह गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी तीन मंत्रिपदे रिक्त होती आणि आता या तीन मंत्र्यांच्या समावेशाने त्यांच्या मंत्रिमंडळात खुद्द सावंत यांच्यासह बारा सदस्य झाले आहेत.

ढवळीकर हे मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आणि सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये २०१७ ते २०१९ दरम्यान मंत्री होते आणि गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. तर हलर्णकर हे पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते आणि २०१९ मध्ये इतर नऊ आमदारांसह भाजपामध्ये सामील झाले. त्याचबरोबर फळदेसाई हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत.

हे ही वाचा:

‘लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न’

आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या

‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया

सोमय्या पिता पुत्रांना मुंबई पोलिसांचे समन्स

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २० जागा जिंकल्या होत्या. भाजापाकडे बहुमताच्या आकड्यापेक्षा एक जागा कमी होती. मात्र, तीन अपक्ष आमदार आणि दोन एमजीपी आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा