33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरराजकारण‘शेतकऱ्याचा जन्म नको म्हणायची वेळ ठाकरे सरकारने आणलीये’

‘शेतकऱ्याचा जन्म नको म्हणायची वेळ ठाकरे सरकारने आणलीये’

Google News Follow

Related

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत दिलेली नाही यावरून विरोधकांनी नेहमीच सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकार उदासीन असल्याचा आरोप शेतकरी नेते आणि सामान्य शेतकऱ्यांकडूनही करण्यात येतो. याचा परिणाम म्हणजे शेतकरी आत्महत्या होत असतात. पंढरपुरमधील एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी या तरुणाचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, ‘पंढरपूरचा हा तरणाबांड शेतकरीपुत्र आत्महत्येपूर्वी म्हणतो “शेतकरी नामर्द आहे, शेतकऱ्याच्या जन्माला कधीच येणार नाही” हे म्हणायची वेळच या सरकारने शेतकऱ्यांवर आणली आहे. भावांनो, कुणीही टोकाचे पाऊल उचलू नका. संघर्ष आपल्या रक्तात आहे, आपण आपला वाटा हिसकावून घेऊ. भावपूर्ण श्रद्धांजली.

हे ही वाचा:

रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!

‘खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे’

युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी

…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीचा सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. विष प्राशन करतानाचा स्वतःचा व्हिडीओ त्याने व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये तो “शेतकरी नामर्द आहे, शेतकऱ्याच्या जन्माला कधीच येणार नाही. आपलं आयुष्य इतकच. सरकार कधीच शेतकऱ्याच्या नादी लागत नाही.” असे वक्तव्य या तरुणाने केले आहे. त्यानंतर सुरज याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा