30 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरराजकारणजाळपोळ करणाऱ्यांविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचे गुन्हे!

जाळपोळ करणाऱ्यांविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचे गुन्हे!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार पावलं उचलत आहे.मात्र, काही समाजकंटकांनी नेत्यांची घरे जाळली आले आहेत तसेच त्यांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान करून वातावरण भयभती करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्यावर ३०७ कलम अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.इथून पुढे जे कोणी असा प्रयत्न करेल त्यावर पोलीस बघ्याची भूमिका घेणार नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.मराठा आरक्षणावरून राज्यात जाळपोळीच्या घटना घडत आहेत त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.जालना येथे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरूच आहे.मात्र, काही समाजकंटकांकडून ठीक-ठिकाणी तोड फोड करण्यात येत आहेत.तसेच काही नेत्यांच्या घरांवर दगडफेक करत त्यांची मालमत्ता जाळण्यात आली.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात पुढाकार घेऊन समाजाला आरक्षण देणार असल्याचे सांगितले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच भूमिका राज्य सरकारची आहे.आजच्या बैठकीत हा निर्णय झाला.

हे ही वाचा:

‘वाघ, बिबळ्या, खवले मांजर, गेंड्यांच्या अवशेषांचा ८८ चिनी औषधांमध्ये वापर’

डाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात

मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल

केजरीवाल यांना ईडीकडून समन्स

मात्र, काही लोकांकडून अनेकांची घरे त्यांची मालमत्ता जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.लोकं घरात असतानाही त्यांची घरे जाळण्यात आली.या घटनेचे सर्व सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज सरकारला मिळाले आहेत.या प्रकरणी आतापर्यंत ५०-५५ लोकांची ओळख पटलेली असून घटने संबंधित उर्वरित लोकांचे ओळख पटवण्याचे काम चालू आहे.संबंधित लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने ३०७ कलम अंतर्गत पोलीस कारवाई करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.तसेच इथून पुढे कोणाला मारून टाकण्याचा अथवा त्याची मालमत्ता जाळण्याचा जे कोणी प्रयत्न करेल त्यावर आता पोलीस बघ्याची भूमिका घेणार नसून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा