29 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
घरविशेष‘वाघ, बिबळ्या, खवले मांजर, गेंड्यांच्या अवशेषांचा ८८ चिनी औषधांमध्ये वापर’

‘वाघ, बिबळ्या, खवले मांजर, गेंड्यांच्या अवशेषांचा ८८ चिनी औषधांमध्ये वापर’

लंडनस्थित पर्यावरणीय तपास संस्था (ईआयए)च्या तपासातून वास्तव आले समोर

Google News Follow

Related

सर्वांत जास्त तस्करी होणाऱ्या आणि ज्यांचे अस्तित्व धोक्यात आहे, असे बिबळे आणि खवले मांजर या सस्तन प्राण्यांच्या अवशेषांचा वापर किमान ८८ पारंपरिक चिनी औषधांसाठी केला जातो,’ असे लंडनस्थित पर्यावरणीय तपास संस्था (ईआयए)च्या तपासात आढळले आहे.

 

किमान ७२ चिनी कंपन्यांकडून या औषधांची निर्मिती केली जाते आणि चीनमधील नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन (एनएमपीए) यांच्याकडून त्यांना अधिकृत परवाना दिला जातो. यातील काही औषधांमध्ये तर वाघ आणि गेंड्यांच्या अवशेषांचाही वापर केला जातो, अशी धक्कादायक बाब उघड झाली आहे.

 

धोक्यात असणाऱ्या प्रजातींबाबत माहिती देणाऱ्या, त्यांची तस्करी रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाबाबत पाऊल उचलणाऱ्या एन्डेन्जर्ड स्पेसिज ऑफ वाइल्ड फौना आणि फ्लोरा (सिटीज) यांनी ही माहिती दिली. या प्राण्यांचा समावेश सिटीजच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. ज्यानुसार, अशा प्राण्यांच्या अवशेषांचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक व्यापारासाठी करण्यास प्रतिबंध आहे.

हे ही वाचा:

डाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात

मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल

केजरीवाल यांना ईडीकडून समन्स

केरळ स्फोट; आरोपीला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक

इतकेच नव्हे तर, फॉर्च्युनच्या अवव्ल ५०० कंपन्यांमध्ये स्थान मिळवलेल्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपीय महासंघ, जपान, स्वित्झर्लंड, ब्रिटन, अमेरिकेतील ६२ बँका आणि आर्थिक संस्थांनी तीन चिनी औषध उत्पादन उद्योगसमूहात गुंतवणूक केल्याचे आढळून आले आहे. या तीन कंपन्यांच्या नऊ उत्पादनांत बिबळ्या आणि खवल्या मांजरांच्या अवशेषाचा वापर केला जातो.

 

ही स्फोटक माहिती ईआयएच्या नवीन अहवालात नमूद करण्यात आली आहे. ‘दुर्मिळ प्रजातीत गुंतवणूक : धोक्यात असणाऱ्या प्रजातींचा वापर पारंपरिक औषधांमध्ये करून जागतिक क्षेत्रात कमवला जाणारा नफा,’ असे या अहवालाचे नाव आहे. ईआयए ही संस्था पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास करून त्याविरोधात लढा देते. तसेच, या संस्थेतर्फे हत्ती, खवले मांजर, वाघ यांच्याविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.

 

धक्कादायक बाब म्हणजे या चिनी औषध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे बहुतेक गुंतवणूकदार हे सामाजिक दायित्व राखून गुंतवणूक तत्त्वांना मान्यता देणारे (पीआरआय) आणि इंटरनॅशनल कॉर्पोरेट गव्हर्नन्स नेटवर्क(आयसीजीएन)चे सदस्य आहेत. या दोन्ही संस्था सातत्याने जैवविविधतेच्या ऱ्हासाबद्दल आणि धोक्यात असलेल्या प्रजातींबाबत सातत्याने आवाज उठवत असतात. यातील सात देश तर, रॉयल फाऊंडेशनच्या युनायटेड फॉर वाइल्डलाइफ फायनान्शिअल टास्कफोर्सचे सदस्य आहेत. ही संस्था वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करते.

 

‘बिबळ्या, खवले मांजर, गेंडे आणि वाघ यांच्या अवशेषांचा पारंपरिक चिनी औषधांमध्ये वापर करणे हे ‘सिटीज’ दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन आहे. अशा प्रकारच्या औषधांना परवाना मिळणे म्हणजे भारत आणि अन्य देशांतील दुर्मिळ प्रजातींसाठी धोक्याची घंटा आहे,’ असे ईआयएचे कायदेशीर आणि धोरणतज्ज्ञ अविनाश बास्कर सांगतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा