31 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरराजकारणराज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Google News Follow

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरगाव येथील या हॉस्पिटलमध्ये काही वेळापूर्वी त्यांना आणण्यात आलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आज सकाळी राज्यपालांना गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार अडचणीत; ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा

महिंद्रा ग्रुपनंतर ही कंपनी देणार अग्निवीरांना नोकरी

शिवसेनेचे ‘हे’ आमदार एकनाथ शिंदेंसोबत

एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राऊतांनी केले कबुल

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ४० पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आल्याच्या चर्चा असताना राज्यपालांची भूमिका या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची असणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने संभाव्य राजकीय घडामोडी या लांबणीवर जाणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा