30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणठाकरे सरकार अडचणीत; ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा  

ठाकरे सरकार अडचणीत; ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा  

Google News Follow

Related

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड आता अधिक तीव्र होण्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये एकनाथ शिंदे आणि काही आमदार असल्याची माहिती काल, २१ जून रोजी होती. त्यानंतर या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे की त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. हे सर्व आमदार स्वखुशीने आलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम करतोय, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना काल शिवसेनेच्या गटनेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याबद्द्ल एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे चर्चेसाठी मिलिंद नार्वेकर यांना पाठवता आणि गटनेते पदावरून काढून टाकता, हे बरोबर नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. गटनेते पदी नवी निवड करण्यात आली आहे ती निवड अवैध ठरू शकते कारण बहुमत आमच्याकडे असा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे.

हे ही वाचा:

महिंद्रा ग्रुपनंतर ही कंपनी देणार अग्निवीरांना नोकरी

शिवसेनेचे ‘हे’ आमदार एकनाथ शिंदेंसोबत

‘धर्मवीर’चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत!

एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राऊतांनी केले कबुल

विधानपरिषदेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते गुजरातमधील सुरतमध्ये मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली. आधी त्यांच्यासोबत तेरा आमदार असल्याची माहिती होती मात्र, नंतर ४० पेक्षा अधिक आमदार असल्याचे एकनाथ शिंदेंकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे अचानक गुजरातला दाखल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. त्यांनतर एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांच्या ट्विटरवरून शिवसेनेचे नाव हटवले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा