33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरराजकारणपालकमंत्री अस्लम शेख यांच्या बॅनरबाजीने नगरसेवक वैतागले!

पालकमंत्री अस्लम शेख यांच्या बॅनरबाजीने नगरसेवक वैतागले!

Google News Follow

Related

मुंबई शहराला दोन पालकमंत्री देण्यात आले आहेत. शहरासाठी अस्लम शेख आणि उपनगरासाठी आदित्य ठाकरे हे हे पालकमंत्री आहेत. पण या दोन्ही नेत्यांना त्यांच्या मतदारसंघाशिवाय बाहेरचे जग नाही की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे मालाड पश्चिम येथील अस्लम शेख यांची झालेली बॅनरबाजी. तिथे झालेल्या कामासाठी अस्लम शेख यांचे आभार मानणारे बॅनर झळकले आहेत. या कामामुळे सर्वच विरोधी पक्षांचे नगरसेवक चांगलेच नाराज झाले आहेत.

अस्लम शेख हे मालाड विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे तीन, शिवसेनेचा एक आणि भाजपचे दोन असे मिळून सहा नगरसेवक आहेत. या सर्व नगरसेवकांच्या क्षेत्रात सध्या गटारे, रस्ते अशी कामे महापालिकेकडून सुरू आहेत. मात्र आमदार अस्लम शेख मोठमोठे होर्डिंग लावून स्वतःची आणि मुलाची जाहिरात करत कामाचे श्रेय घेत आहेत. या प्रभागांतील नगरसेविकांमध्ये भाजपच्या योगिता कोळी व जया सतनामसिंग टेवाना, शिवसेनेच्या गीता भंडारी आदींचा समावेश आहे.

मालाडमध्ये महापालिकेकडून सध्या गटारे आणि रस्त्यांची कामे केली जात आहेत. याचे कारण म्हणजे आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारी. सर्व नगरसेवक या आपल्या कार्याच्या तपशीलाचा भडिमार करत आहेत. मात्र युतीच्या पालकमंत्र्यांनी स्वत:चा व मुलाच्या नावाने या सर्व कामाच्या श्रेयाचे होर्डिंग लावले आहेत. यामुळे महापालिकेच्या कामांमध्ये आपल्या कुटुंबाचा प्रचार करणाऱ्या अस्लम शेख यांच्याबद्दल नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

मालाडचे आमदार आणि राज्य सरकारचे मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते मालाडमध्ये टिपू सुलतान नाव असलेल्या क्रीडांगणातील सुविधांचे लोकार्पण झाले. त्यावर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार टीका झाली.  मात्र आघाडीचा धर्म पाळून शिवसेना नेते अस्लम शेख यांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्या बाजूने बोलू लागले. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

 

हे ही वाचा:

मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय

सामूहिक बलात्काराने पेण हादरले; सात जणांना घेतले ताब्यात

नथुरामवरील चित्रपटाचे भवितव्य

कोर्ट ‘मविआ’ला दिलासा का देत नाही?

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना मंत्री अस्लम शेख कालपर्यंत आपलेच वाटत होते आणि तेच नगरसेवक मालवणी येथील शेख यांच्या कार्यालयात मोठ्या कौतुकाने हजेरी हजेरी लावत असत पण तेच आता गप्प बसले आहेत. हे पालकमंत्री मुंबई शहरातील आहेत की फक्त मालाडचे? हा प्रश्न त्या सर्वांना पडत आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा