31 C
Mumbai
Tuesday, February 17, 2026
घरराजकारणबांगलादेशातील हिंदूंनी लढा द्यावा, जगातील हिंदू पाठींबा देतील!

बांगलादेशातील हिंदूंनी लढा द्यावा, जगातील हिंदू पाठींबा देतील!

सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी केले आवाहन

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी संकटग्रस्त बांगलादेशमधील हिंदूंच्या स्थितीवर तीव्र भूमिका मांडली. बांगलादेशमधील हिंदूंनी जर आपल्या हक्कांसाठी उभे राहून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला, तर जगभरातील हिंदू त्यांना पाठिंबा देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

“बांगलादेशमध्ये सुमारे १.२५ कोटी हिंदू आहेत. त्यांनी तिथेच राहून लढण्याचा निर्णय घेतला, तर जगभरातील सर्व हिंदू त्यांना मदत करतील,” असे भागवत यांनी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना सांगितले.

मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर येथे ‘संघ प्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज’ या दोन दिवसीय व्याख्यानमालेत ते बोलत होते.

गेल्या काही महिन्यांत बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर, जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. ही परिस्थिती भारतविरोधी कट्टरपंथी विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर अधिक चिघळली. निर्वासित पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताच्युतीनंतर देशभरात आंदोलन झाले. हे आंदोलन ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या, ‘जुलै उठाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी चळवळीनंतर उफाळून आले.

या अशांत काळात देशभरात हिंसक जमावाने हिंदू नागरिकांना लक्ष्य केले. यात व्यापारी, मजूर आणि विद्यार्थ्यांसह अनेकांचा मृत्यू झाला. हे हल्ले रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान अल्पसंख्याकांवर संघटित पद्धतीने करण्यात आले.

देशांतर्गत प्रश्नांवर बोलताना मोहन भागवत म्हणाले की,  “पूर्वी सरकारांनी लोकसंख्येतील बदलांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. जन्मदर आणि बेकायदेशीर घुसखोरी ही त्यामागची कारणे आहेत. आता सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून ती यशस्वी ठरेल,” असे भागवत म्हणाले.

हे ही वाचा:

मोठ्या गर्जना, पण शेवटी माघार! पाकिस्तानची पुन्हा फजिती

PSL मध्ये परवानगीशिवाय भारतीय वंशाच्या अग्नि चोप्राच्या नावाने खळबळ

‘सरसंघचालकपद हे जातीनुसार नव्हे, तर पात्रतेनुसार मिळते’

“टेक्सासमधील डॅलस परिसरात फिरताना वाटते पाकिस्तानमध्ये आहोत”

भारताला आता कमजोर करता येणार नाही, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले. “भारताला आता तोडता येणार नाही. जे भारताला तोडण्याचा प्रयत्न करतील, ते स्वतःच उद्ध्वस्त होतील,” असे ते म्हणाले.

मुस्लिमबहुल भागांतील कार्याविषयी बोलताना भागवत म्हणाले की संघ संघर्ष टाळण्याचा मार्ग स्वीकारतो. “मुस्लिम भागांतील आव्हाने प्रतिक्रिया न देता हाताळली जातात. ते शिवीगाळ करतात, पण आम्ही प्रत्युत्तर देत नाही. त्यामुळे संघर्ष वाढत नाही,” असे त्यांनी सांगितले.

रविवारी केलेली ही विधाने शनिवारी झालेल्या भाषणानंतर आली आहेत. त्या वेळी भागवत म्हणाले होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाच्याही विरोधात नाही, तो सत्ता मिळवू इच्छित नाही आणि दबावगट म्हणूनही कार्य करत नाही.

“संघ कोणाच्याही विरोधात नाही. त्याला सत्ता नको आहे. समाजाला एकत्र आणणे हाच त्याचा उद्देश आहे,” असे भागवत यांनी सांगितले. आरएसएस चे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी समाजातील एकतेचा अभाव ओळखून १९२५ साली संघाची स्थापना केली, असेही त्यांनी आठवण करून दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा