26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारण'आरक्षण ना कधी काढले गेले ना कधी काढले जाणार'

‘आरक्षण ना कधी काढले गेले ना कधी काढले जाणार’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची गर्जना

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जोरदार प्रचार सुरू आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची बुधवारी( १ मे) सभा पार पडली.कोरबा लोकसभा मतदारसंघातून भाजपने सरोज पांडे यांना उभे केले आहे.दरम्यान, सरोज पांडे यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

मंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेसने ७० वर्षे रामजन्मभूमीचा मुद्दा लटकवून ठेवला होता.२२ जानेवारीला आम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळा करून ‘जय श्री राम’ केला.५०० वर्षांनंतर आपल्या आयुष्यात तो दिवस आला जेव्हा आपण सूर्यतिलक सोहळा पाहिला.आम्ही काँग्रेस नेत्यांना अभिषेकासाठी आमंत्रणे पाठवली, पण त्यांनी येण्यास नकार दिला.काँग्रेस आली तर विचारा त्यांना कोणत्या तोंडून तुम्ही मते मागायला आला आहात, असे शहा म्हणाले.

गृहमंत्री पुढे म्हणाले की, काँग्रेससाठी व्होट बँक सर्वात महत्त्वाची आहे. भूपेश सरकारने नक्षलवादाला प्रोत्साहन दिले. ५ वर्षात अनेक राज्यातून भाजपने राज्यातून नक्षलवाद संपवला आहे.मात्र, भूपेश बघेल याला बनावट चकमक म्हणत आहेत.ते पुढे म्हणाले, नक्षलवाद्यांनी स्वतःचे नुकसान झाल्याचे मान्य केले.आता काळजी करण्याची गरज नाही, भाजप नक्षलवाद संपवेल आणि नक्षलवादाला जावेच लागणार.ते पुढे म्हणाले की, कोरबा ही अवघड जागा आहे.मागच्या वेळी तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला नाहीत.आता या भागातून सरोद पांडे उभे राहिले आहेत.त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन मंत्री शहा यांनी केले.

हे ही वाचा:

तामिळनाडूतील करियापट्टी येथील दगडखाणीत स्फोट!

अतिक अहमद, शहाबुद्दीन आणि मुख्तार अन्सारी यांच्या नावाने मते !

संपत्ती पुनर्वाटपाचे विचार बाळबोध आणि अज्ञानीपणाचे!

‘सॉरी पापा’ लिहीत नीटच्या परीक्षार्थी मुलाची आत्महत्या

पंतप्रधान मोदींचा १० वर्षांचा रेकॉर्ड आणि २५ वर्षांचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. छत्तीसगड हे आदिवासींचे क्षेत्र आहे. आमचे सरकार गरिबांचे सरकार आहे.गरिबांना घर, नळाचे पाणी, गॅस सिलिंडर, ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा, ५ किलो तांदूळ, शौचालय दिले आहे. कोरोनाची लस मोफत दिली.त्यावेळी काँग्रेस त्याला ‘मोदी लस’ म्हणत होते. देशातील गरिबांची चिंता करणे आणि छत्तीसगडला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणे हे भाजपचे उद्दिष्ट असल्याचे शहांनी सांगितले.

काँग्रेसवर टीका करत अमित शहा म्हणाले की, भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आम्ही काश्मीरमधून कलम ३७० हटवले. कोरबाचे प्रत्येक मूल काश्मीरसाठी प्राणाची आहुती देण्यास तयार आहे. काँग्रेसने ७० वर्षांपासून ३७० ला आपल्या बाळाप्रमाणे मांडीवर घेऊन पोसले होते.पंतप्रधान मोदींनी २०१९ मध्ये कलम-३७० रद्द केले. ७० वर्षांनंतर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला गेला.पंतप्रधान मोदी आरक्षण रद्द करतील, असे काँग्रेसचे म्हणणे आहे परंतु, मी तुम्हाला सांगतो, ‘आरक्षण ना कधी काढले गेले ना कधी काढले जाणार’, असे अमित शहा म्हणाले.पंतप्रधान मोदींनी जर काही हटवले असेल तर ते म्हणजे, कलम-३७० आणि नक्षलवाद.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा