31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरविशेषटीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला करा!

टीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला करा!

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचे आवाहन

Google News Follow

Related

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर राजन चौधरी यांनी बुधवारी पश्चिम बंगालमधील बेरहामपूर येथील एका सभेत सभेत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. टीएमसीला मतदान करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाला मतदान करावे, असे चौधरी म्हणाले.
“टीएमसीला मत का द्यायचे, भाजपला मतदान करणे केव्हाही चांगले, असे स्पष्ट त्यांनी सांगितले आहे. बेहरामपूरमधील भाषणादरम्यान ते बंगाली भाषेत बोलत होते. या भासःनाचा एक व्हिडीओ आता समोर आला असून तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा..

हैदराबादमध्ये अपराजित ओवैसी यांना कडवे आव्हान माधवी लता यांचे

‘न्यूजक्लिकच्या संस्थापकाकडून दहशतवादी गटांना आर्थिक मदत’

सलमान खान गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची तुरुंगातच आत्महत्या

तामिळनाडूतील करियापट्टी येथील दगडखाणीत स्फोट!

जरी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ‘इंडी’ आघाडीच्या बॅनरखाली “एकतेचा” दावा करत असले तरी वस्तुस्थिती काय आहे हे या चौधरी यांच्या विधानावरून जाणवते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि टीएमसीमध्ये पारंपारिक वाद आहे. विशेषत: ममता बॅनर्जी यांनी दोन राजकीय पक्षांमधील चर्चा विस्कळीत करून इंडी आघाडीला केवळ दोन जागांची ऑफर दिली होती. त्यानंतर टीएमसीने पुढे जाऊन पश्चिम बंगालमधील सर्व ४२ लोकसभा जागांवर उमेदवारांची घोषणा केली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चौधरी यांची सततची टीका ही विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीतून बाहेर पडण्याच्या टीएमसीच्या निर्णयाचा मुख्य घटक मानला जातो. युती स्थापन करण्यात बॅनर्जी यांची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता हे पाऊल विशेषतः उल्लेखनीय आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील वैर वाढवत, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने या आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यावर टीका केली आणि काँग्रेसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अधीर रंजन चौधरी काँग्रेस या दोन स्वतंत्र घटकांचे अस्तित्व सुचवले. माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना बर्हामपूर संसदीय जागेवरून पक्षाचे उमेदवार म्हणून नियुक्त करण्याच्या बॅनर्जींच्या निर्णयावर चौधरी यांनी केलेल्या तीव्र टीकेला टीएमसीचा जोरदार प्रतिवाद होता. ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेस आणि चौधरी यांचे वर्चस्व आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा