शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले. त्यांची इच्छा असेल तर आपण शिवसेना पक्ष प्रमुख पद सोडू अशी घोषणा त्यांनी केली.
माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, मी कसा आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या माणसाने एक बोट दाखवलं तर मी क्षण राहत नाही. म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं. मला काही हवं असतं तर मी विधानसभेत बसलो असतो. ६० वर्ष पूर्ण झाले. मी १२ वर्षापासून नेतृत्व करतो. माझ्यावर जे आरोप झाले. ते खरे असतील तर मला सांगा मी आता पायउतार व्हायला तयार आहे. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या. तो पक्षप्रमुख होईल. ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ देऊ नये. पण लाचार आणि गद्दार नको. लाचार गद्दार आणि भेसळयुक्त माणूस माझ्यावर आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मी पद सोडायला तयार आहे. मी डगमगलो नाही. मी खचलेलो नाही. अनेक संकट आली अनेक वादळं आली. मी पळणारा नाही. मी पहाडासारखा उभा राहीन,. जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच मी करेन. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी पद सोडल्याशिवाय राहणार नाही.
हे ही वाचा:
काँग्रेसमध्ये आदित्य ठाकरेंची मोठी भूमिका?
अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थापनात आमूलाग्र बदल हवाय!
कर्नाटकातून बेपत्ता झालेले महिला आणि मुलगा केरळमधील मदरशात आढळले
वडील आजारी, तरी देशासाठी झुंजतोय मेसी!
ते म्हणाले की, शिवसेना हवी की नको याचा विचार करा. खासदारांवर देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते चांगलेच भावुक झाले. आज गद्दारी झाली त्या वॉर्डातील मतदारांची मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, आज माझ्यावर टीका होत आहे. माझ्या पत्नीवर टीका होत आहे. तेजसवर टीका होत आहे. भाजपने दगा दिला म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. मातोश्रीने फक्त सोसायचं. तुम्ही मंत्री व्हायचं, खासदार व्हायचं, तुमच्या मुलाने आमदार व्हायचं, पण मातोश्रीने काहीच करायचं नाही. .
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज गद्दारी झाली त्या वॉर्डातील मी मतदारांची माफी मागतो. मोदींची लाट असताना माझ्यावर विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं, हे आम्हाला डिवचलं जात होतं. मोदींच्या चेहऱ्यावर खासदार निवडून आले म्हणत होते. मोदींचा चेहरा न वापरता आपले ९ खासदार निवडून आले. आज परत फोडाफोडी, कशासाठी फोडताय?
उद्या समजा शिवसेना निवडणुकाच लढणार नाही. मग काय करतील? तुम्ही राहणार का माझ्यासोबत? मरमर मेहनत तुम्ही करायची, यांचे खोक्यावर खोके. शेतकऱ्यांना हमीभाव नाही, पण खासदारांचे हमी भाव ठरले, अशी टीकाही त्यांनी केली.







