31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणआयएमए अधिकारी धर्मपरिवर्तनात मग्न

आयएमए अधिकारी धर्मपरिवर्तनात मग्न

Google News Follow

Related

योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमए यांच्यात सुरु झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. आता तर रामदेव यांनी आयएमए अधिकाऱ्यांचा संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी असून ते धर्म परिवर्तन करण्यासाठी उकसवतात असा आरोप केला आहे.

योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा वाद आता आणखी गंभीर होताना दिसतो आहे. कारण रामदेव यांनी आता आयएमएच्या पदाधिकाऱ्यांवर जे आरोप केलेत ते गंभीर आहेत. हिंदी वर्तमानपत्र दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत रामदेव यांनी सनसनाटी आरोप केलेत. धर्मपरिवर्तन करणाऱ्या लोकांशी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे संबंध आहेत, एवढच नाही तर इंटरनॅशनल फंडिंग घेणाऱ्या लोकांनीच कुंभला कोरोना सुपरस्प्रेडर म्हणत बदनाम केल्याचही रामदेव म्हणाले. हे सगळं धादांत खोटं आहे. कारण कुंभमध्ये लोकच आले नाहीत. ९९ टक्के तंबू रिकामे होते आणि आखाड्यांमध्ये फार फार तर पाचशे ते एक हजार साधू होते असाही रामदेव यांनी दावा केला.

रामदेव सवाल करतात की, डॉक्टर मला देशद्रोही म्हणत असतील तर मग देशभक्त कोण आहे? देशभक्त ते लोक आहेत ज्यांचे संबंध धर्मपरिवर्तनाशी जोडले गेलेत? ज्यांना असं वाटतं की, कोरोना चांगला आहे कारण त्यामुळे धर्मपरिवर्तनही वाढेल. हे असं म्हणतात की, कोरोनासाठी औषधाची गरज नाही, धर्माची विशेष कृपा झाली की सगळं ठिक होईल. अशी अंधश्रद्धा बाळगणारे लोकच तर आयएमएचे अध्यक्ष झालेले आहेत असही रामदेव यांनी म्हटलं आहे.

रामदेव यांनी आरोप केलाय की, कुंभला कोरोनाचा सुपरस्प्रेडर म्हणणाऱ्यांना विदेशातून फंड मिळतो. हे लोक ‘हर की पौडी’चे फोटो दाखवून त्याला कुंभ म्हणतायत. असं करणाऱ्यांमध्ये हिंदू विरोधी, भारत विरोधी आणि सोशल मीडियातली एक लॉबी सामिल आहे. कुंभमध्ये ९९ टक्के तंबू रिकामे होते आणि आखाड्यांमध्ये हजारपेक्षा जास्त साधू नव्हते. फक्त दोन ते तीन साधूंचा मृत्यू झाला. देशात ५ ते ७ लाख साधू आहेत, त्यापैकी ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर कुंभने कोरोना पसरवला का? असा सवालही रामदेव यांनी केला आहे.

हे ही वाचा:

कसोटी अजिंक्यपद लढत अनिर्णीत किंवा बरोबरीत सुटल्यास काय होणार?

ग्लोबल टेंडरकडून निराशेनंतर ‘या’ सहा शहरांना विनंती

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

असं काय काळंबेरं आहे जे हे वसुली सरकार लपवू इच्छित आहे

रामदेव यांनी दावा केलाय की, ऍलोपॅथीशी संबंधीत ९० टक्के डॉक्टर्सही योग, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी उपचाराशी सहमत आहेत. आयएमएचे जे लोक आमच्याविरोधात झेंडा उचलून विरोध करतायत ते ही घरी कपालभाती करतात. ज्या वक्तव्याच्या आधारावर माझ्यावर राजद्रोहाचा आरोप केला जातोय ते मी केलेलच नाही. मी तर सोशल मीडियावर आलेला एक मेसेज वाचवून दाखवत होतो. कोरोनीलवर रामदेव म्हणाले की, कोवॅक्सिनलाही डब्ल्यूएचओने मान्यता दिलेली नाही. तिथं एक लॉबी काम करते, ज्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं मिळतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा