30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरराजकारणतुरुंगवास चालेल पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंची हक्कभंग कारवाई संदर्भात भूमिका

तुरुंगवास चालेल पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंची हक्कभंग कारवाई संदर्भात भूमिका

पत्र लिहित स्पष्ट केली भूमिका

Google News Follow

Related

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग कारवाई होऊ शकते असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे. माफी मागणारे पत्र न लिहिल्यास ही कारवाई होऊ शकते, असं सांगण्यात आले होते. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्र लिहिलं आहे. मी माफी अजिबात मागणार नाही. यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, असं अंधारे यांनी पत्रात म्हटलं आहे.

उपसभापती नीलम गोऱ्हे या आमदार रवींद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर हे विधान परिषद सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळे तात्काळ सुषमा अंधारे यांच्यवर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती. त्यानंतर सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगण्यात आले.

सुषमा अंधारेंनी पत्रात काय म्हटलं आहे?

त्यांनी हे पत्र लोकशाही व्यवस्थेला लिहिले आहे. “तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते.  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील ‘व्यक्तीने’  माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले, किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहूत, नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे,” असं त्या म्हणाल्या आहेत.

“सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत पण जर खरेच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग या सभापती पदाचे किंवा या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे. त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबार मध्ये मंत्री असणारे चंद्रकांत पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे  तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेत फलक आणण्यास प्रवृत्त केले

‘तोंड सांभाळून बोला…’

कर्तव्यपथावर बजरंगने ‘पद्मश्री’चा केला त्याग

ब्रिटिशकालिन कायदे बदलले हा ऐतिहासिक क्षण!

प्रकरण काय?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप करत व्हिडिओ व्हायरल केला होता. दरम्यान यावरूनच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नसल्याचे मत मांडले. तसेच, माहिती न घेता आरोप करणे चुकीचे असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा