27.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरराजकारण'राजेश टोपे यांचे वक्तव्य असंवेदनशील'

‘राजेश टोपे यांचे वक्तव्य असंवेदनशील’

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची टीका

विरारमध्ये घडलेल्या अग्नितांडवात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही राष्ट्रीय बातमी नाही, असे विधान पत्रकारांशी बोलताना केल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर टीका करताना असे विधान करणे ही असंवेदनशीलता आहे, असे म्हटले. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ते जर असे म्हणाले असतील तर ही असंवेदनशीलता आहे. कोणत्या मानसिकतेत ते असे म्हणाले हे मला माहीत नाही. पण अशा घटनांच्या बाबत आपण संवेदनशील असले पाहिजे, अशा प्रतिक्रिया देणे टाळले पाहिजे.

हेही वाचा:

विरारचे जळीत कांड ही नॅशनल न्यूज नाही, आरोग्यमंत्र्यांचे निबर विधान

विरारच्या विजय वल्लभ हाॅस्पिटलमध्ये अग्नितांडव

विरार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मोदींचा मदतीचा हात

फडणवीस यांनी या दुर्दैवी घटनेसंदर्भात जे चौकशीचे फार्स होतात, त्याबद्दलही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कोविडचं भय लोकांच्या मनात आहे. त्यात हॉस्पिटलमधील अशा घटनांमुळे भर पडत आहे. प्रत्येक घटनेनंतर आम्ही याची चौकशी करू सांगतात, हॉस्पिटलचे फायर ऑडिट करू. ते आवश्यकही आहे. पण ते होत नाही. कोविड काळात हॉस्पिटलवर ताण आहे, पण या परिस्थितीत अशी व्यवस्था उभी केली पाहिजे, की ज्यातून अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत. त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. हॉस्पिटलला सरकारने मदत केली पाहिजे. फडणवीस पुढे म्हणाले की, भंडारा, ईशान्य मुंबई, नाशिक, विरारच्या घटना भयानक आहेत, याक्षणी मी एवढेच म्हणेन की मृत्युमुखी पडले आहेत, त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. जे बाकी पेशंट आहेत, त्यांची योग्य देखभाल व्हावी अशी प्रशासनाकडून अपेक्षा आहे. घटनेच्या मुळाशी जावे आणि अशा घटना होऊ नयेत भविष्यात यासाठी ठोस पावले सरकारने उचलावी, अशी विनंती आहे.
याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. भंडारा, नागपूर, नाशिक, ईशान्य मुंबई, विरार या घटनेनंतर आपण प्रतिक्रिया देतो आहोत, पण या घटना होऊ नयेत, यासाठी आपलं पाहिजे तेवढं लक्ष नाही. या घटनांनी ही करोनाविरोधातील लढाई अडचणीची होते आहे. म्हणून सरकारचे याप्रकारचे जे विभाग आहेत, त्यानी प्रतिक्रिया न देत बसता पुढील एक महिना, ४५ दिवसांत सेफ्टी ऑडिट होईल, असा प्रयत्न केला पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा