29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणजगदीप धनखड यांनी मोठ्या फरकाने जिंकली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

जगदीप धनखड यांनी मोठ्या फरकाने जिंकली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

Google News Follow

Related

भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाली असून भाजपा प्रणित एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मोठ्या फरकाने पराभूत करत उपराष्ट्रपतीपदाची ही निवडणूक जिंकली. वेंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदाची मुदत १० ऑगस्ट २०२२ला संपुष्टात येत असून धनखड हे नवे उपराष्ट्रपती असतील.

धनखड यांनी ७२५ मतांपैकी ५२८ मते घेतली तर मार्गारेट अल्वा यांना अवघी १८२ मते पडली. एकूण मतदारांची संख्या ७८० होती, त्यापैकी ७२५ जणांनी मतदान केले.

७२५ मतांपैकी १५ मते बाद ठरली. उपराष्ट्रपतीपदाबरोबरच धनखड हे वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेचे सभापतीही असतील.

हे ही वाचा:

अस्लम शेख… चुकीला माफी नाही!

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून केले उद्धव ठाकरेंना ‘वेगळे’

370 हटले, साखळदंड तुटले !

व्यापाऱ्याने केला पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्काराचा प्रयत्न

 

शनिवारी या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. केवळ लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारच या निवडणुकीत मतदान करू शकणार होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सकाळी मतदान केले भाजपाचे खासदार सनी देओल तसेच संजय धोत्रे यांनी आजारी असल्यामुळे मतदान केले नाही. तृणमूल काँग्रेसचे ३९ खासदार असून त्यात २३ हे लोकसभेत आहेत. या निवडणुकीपासून दूर राहण्याचे आदेश ममता बॅनर्जी यांनी आपल्या खासदारांना दिले होते. त्यामुळे अल्वा यांची मते कमी झाली. मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी निश्चित करताना तृणमूलला विचारण्यात आले नाही, यास्तव ममतांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचे आदेश खासदारांना दिले होते.

धनखड हे राजस्थानच्या झुनझुनू जिल्ह्यातील आहेत. १८ मे १९५१ला त्यांचा जन्म झाला. पेशाने ते वकील आहे. १९८९पासून ते राजकारण सक्रीय झाले. झुनझुनूमधून ते लोकसभेसाठी निवडून गेले. १९९०-१९९१ या काळात ते केंद्रीय मंत्रीही राहिले. राजस्थान विधानसभेचे सदस्यही ते होते. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले. १७ जुलैला एनडीएने त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा