29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरराजकारणजगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

भारताचे १४वे उपराष्ट्रपती

Google News Follow

Related

जगदीप धनखड हे देशाचे १४ वे उपराष्ट्रपती झाले आहेत. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी गुरुवारी त्यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. धनखड यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हाॅलमध्ये आयाेजित करण्यात आलेल्या या शपथग्रहण साेहळ्याला माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, माजी राष्ट्रपती रामनाथ काेविंद, लाेकसभा अध्यक्ष ओम बिडला आणि पंतप्रधान नरेंद्र तसेच अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखर यांना विजयी घोषित करण्यात आले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७८० पैकी ७२५ खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीत धनखड यांनी विराेधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा माेठ्या फरकाने पराभव केला. धनखड यांना ५२८, तर अल्वा यांना १८२ मते मिळाली हाेती. या आधी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल हाेते.

राजस्थानच्या शेतकरी कुटुंबाशी नाते

नवनिर्वाचित उपाध्यक्ष जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. चित्तोडगड सैनिक शाळेतून त्यांनी आपले शाले शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थानमधूनच कायद्याची पदवी घेतली. राजस्थान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी प्रॅक्टिस केली.

हेही वाचा:

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

१९८९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत

धनखड हे १९८९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेचे खासदार झाले. त्यांनी झुंझुनूमधूनच लोकसभेची जागा जिंकली. १९९० मध्ये ते संसदीय कामकाज राज्यमंत्री झाले. १९९३ मध्ये अजमेर जिल्ह्यातील किशनगड विधानसभेतून राजस्थान विधानसभेवर निवडून आले. २०१९ मध्ये त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले. धनखड यांचा राजकीय प्रवास १९८९ पासून सुरू झाला. त्या वर्षी धनखड यांनी झुंझुनू येथून जनता दलाच्या तिकिटावर भाजपच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती आणि ही निवडणूक जिंकून पहिल्यांदाच ते संसदेत पोहोचले होते. धनखड हे केंद्र सरकारमध्ये मंत्रीही होते.

काॅंग्रेसमध्ये गेले पराभवाला सामाेरे

जनता दल फुटल्यावर ते माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या छावणीत गेले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धनखड यांना काँग्रेसने अजमेरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसनंतर धनखर यांनी २००३ साली भाजपमध्ये प्रवेश केला.

उच्च शिक्षित कुटुंबातील

जगदीप धनखड यांच्या पत्नीचे नाव सुदेश धनखड आहे. त्यांनी बनस्थली विद्यापीठ या नामांकित विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. जगदीप धनखड आणि सुदेश धनखड यांना एक मुलगी आहे. ज्याचें नांव कामना आहे . त्यांचे शालेय शिक्षण जयपूरच्या एमजीडी स्कूलमधून झाले. कामना यांनी युनायटेड स्टेट्समधील बीव्हर कॉलेज (आता आर्केडिया विद्यापीठ) मधून पदवी प्राप्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा