31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरराजकारणउपराष्ट्रपती जगदीप धनखड कणखर हिंदुत्ववादी

उपराष्ट्रपती जगदीप धनखड कणखर हिंदुत्ववादी

Google News Follow

Related

भारताच्या चौदाव्या उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांची निवड झाली. येत्या ११ ऑगस्टला धनखड उपराष्ट्रपतीपदावर विराजमान होणार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. पण जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती झाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मागच्या आठवणी ताज्या झाल्यात.

२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आणि ममता बॅनर्जी पुन्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. २ मे २०२१ ला या निवडणुकीचा निकाल लागला आणि ममता बॅनर्जी विजयी झालेल्या. निकाल लागल्यानंतर याच दिवशी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला. निकालांनंतर पश्चिम बंगालमध्ये जे काही घडले, ते अतिशय भयानक होते. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारचा देशात राजकीय हिंसाचार घडला होता. या हिंसाचारात अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्बहल्ला केल्याने अनेकांचे या हल्ल्यात प्राण गेले. भाजपाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली. घरं, दुकानं, सरकारी मालमत्तांची जाळपोळ झाली. महिलांवर अत्याचार, मारहाणीच्या घटना घडल्या. राज्यात हिंसाचाराचे थैमान एवढं भयानक होत की, राज्यातील नागरिकांना आपलं राहतं घर, गाव आणि राज्य सोडून अन्य राज्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

त्या वेळी पश्चिम बंगालमधील अनेक हिंदूंनी आसाम, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये आश्रय घेतला होता. राज्यात हा हिंसाचार महिनाभर चालला होता. पण महत्वाचं म्हणजे ममता बॅनर्जी सरकराने जाणीवपूर्वक या हिंसाचारकडे दुर्लक्ष केले होते. राज्यातील हिंसाचार रोखणं जनतेला संरक्षण देणं हे सरकारच काम होत. पण त्यांच्यासाठी राज्यात असं काही घडलंच नव्हतं. हा हिंसाचार केवळ राजकीय हिंसाचार नव्हता किंवा केवळ तृणमूल काँग्रेसने भाजपाला धडा शिकविण्यासाठी केलेला हिंसाचार नव्हता, तर हा थेट हिंदूंविरोधात पुकारण्यात आलेला जिहादी हिंसाचार होता.

एकीकडे तृणमूल काँग्रेस सत्ताप्राप्तीचा आनंद साजरा करत होते, तर दुसरीकडे सर्वसामान्य हिंदू नागरिक आपल्या जीवाच्या भितीने अन्य राज्यांमध्ये पलायन करत होते. पश्चिम बंगालच्या अनेक नागरिकांनी आसाममध्ये पलायन केले होते. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी या नागरिकांना आपल्या राज्यात संरक्षण दिले होते. मात्र बंगाली नागरिकांनी आपल्या राज्यात पुन्हा परतावं यासाठी बंगालचे राज्यपाल प्रयत्न करत होते. त्यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल हे आता झालेले आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे होते. राज्यात चाललेला हा हिंसा आणि सरकार करत असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे त्यांना खटकत होते. राज्यातून इतर राज्यात गेलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जगदीप धनखड सतत प्रयत्न करत होते.

धनखड यांनी आसाममध्ये जाऊन बंगाली नागरिकांना परत येण्यासाठी विनंती केली होती. त्यांनी स्वतः नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली होती. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मुखयमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यात जे सुरु आहे त्याकडे जातीनं लक्ष घालण्यास सांगितलं होतं. मात्र तरीही याकडे राज्य सरकारने लक्ष दिले नाही. मग मात्र राज्यपाल धनखड यांनी कठोर भूमिका घेत, आसामध्ये गेलेल्या बंगाली नागरिकांना राज्यात परतण्याचे आवाहन केलंय त्या नागरिकांवर जो कोणी गोळी झाडेल ती गोळी आधी माझ्या छातीवर घेण्यास मी तयार असल्याचं धनखड म्हणाले होते. तेव्हा कुठे बंगाल सरकारने परराज्यात पलायन केलेल्या बंगाली नागरिकांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर धनखड यांच्या प्रयत्नांनी बंगाली जनतेला न्याय मिळाला.

राज्यपाल असताना राज्यात कायदा व सुव्यवस्था राखला जावा यासाठी धनखड हे नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांच्या या कामाची त्यांना अखेर पोचपावती मिळालीच. जयदीप धनखड यांनी मार्गरेट अल्वा यांचा मोठ्या फरकाने पराभव करत संपूर्ण मतांपैकी ७० टक्क्यांहून अधिक मत त्यांनी मिळवले. त्यांचे हे यश मोठे आहे.

जयदीप धनखड यांचा जन्म १९५१ मध्ये राजस्थानातील किठाना गावात झाला. ग्रॅजुएशन पूर्ण झाल्यानंतर धनखड यांनी राजस्थान उच्च न्यायालयात सराव केला आणि वयाच्या ३५ व्या वर्षी ते हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनले. जगदीप धनखड हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकीलही राहिलेत. राजस्थानमध्ये जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा होतोय जल्लोषात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा

हे घ्या, शरद पवारांच्या मौनाचे कारण

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

धनखड इंग्रजी बोलणारे त्यांच्या गावातील पहिले व्यक्ती होते. गावातील प्रत्येकाने शिक्षित व्हावे आणि इंग्रजी बोलायला शिकावे अशी त्यांची इच्छा असल्याने त्यांनी मुलांसाठी मोफत स्पोकन इंग्लिशचे वर्ग सुरु केले. सोबतच ग्रंथालय देखील उभारले. प्रत्येक पुस्तक तिथे उपलब्ध व्हावे, म्हणून ते प्रयत्नशील असतात असं गावकरी सांगतात. ग्रंथालयासोबत त्यांनी संगणक प्रशिक्षण केंद्र देखील सुरू केले. महिलांनी स्वावलंबी व्हावं म्हणून त्यांनी मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र उघडलं. मागील कारकिर्दीतील त्यांचं हे काम पाहून ते देशाचे उपराष्ट्रपती झाल्याने संपूर्ण देशाला आनंद झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा