30 C
Mumbai
Sunday, October 2, 2022
घरराजकारणसंजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या

Related

राठोड यांचा समावेश दुर्दैवी असल्याची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाल्यानंतर त्यातील १८ मंत्र्यांमध्ये बलात्काराच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या संजय राठोड यांचा समावेश केल्यामुळे भाजपा नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली आहे.

संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप झाला होता. त्यावरून त्यांची महाविकास आघाडी सरकारमधून हकालपट्टी झाली होती. पण आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातून चित्रा वाघ यांनी व्हीडिओच्या माध्यमातून आपली नाराजी जाहीर केली. त्यांनी व्हीडिओच्या माध्यमातून आपली तिखट प्रतिक्रिया कळविली असून त्यांनी म्हटले आहे की, पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या संजय राठोड याचा मंत्रिमडळात झालेला समावेश दुर्दैवी आहे. पण माझा राठोडविरोधातील लढा मी सुरूच ठेवणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात लढेंगे भी जितेंगे भी… न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.

हे ही वाचा:

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

शिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ

ऐका, राऊतप्रकरणी पवारांच्या मौनाचे कारण…

‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी

संजय राठोड हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वनमंत्री म्हणून समाविष्ट होते. पण त्यावेळी त्यांच्यावर पूजा चव्हाणच्या मृत्यूसंदर्भात आरोप झाले होते. पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांना पुणे पोलिसांकडून क्लिन चीट देण्यात आली होती. त्यामुळे अशा व्यक्तीचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आल्यामुळे चित्रा वाघ संतापल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
41,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा