29.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरराजकारणशिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ

शिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ

Google News Follow

शिंदे- फडणवीस सरकारचा आज, ९ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे शिवसेनेतून नऊ आणि भाजपातून नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज शपथविधी सोहळा पार पडला. तर या १८ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी आज कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

हे ही वाचा:

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला

धनखड कणखर हिंदुत्ववादी

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा