29.4 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारणअदर पुनावालांना धमकावणारे शिवसेनेचे गुंड?

अदर पुनावालांना धमकावणारे शिवसेनेचे गुंड?

Google News Follow

सिरम इन्स्टीट्यूटचे सिईओ अदर पुनावाला यांनी टाईम्स युकेला दिलेल्या मुलाखतीत ‘आपल्याला धमक्या मिळत होत्या’ असा गौप्यस्फोट केला आणि एकच खळबळ उडाली. पण आता इंडिया टूडे वाहिनीचे वृत्तनिवेदक राहुल कंवल यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पुनावाला यांना धमकवणारे शिवसेनेचे गुंड होते असा गौप्यस्फोट त्यांनी आपल्या कार्यक्रमात केला आहे.

‘कोविशिल्ड’ ही कोविडवरची लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सिईओ अदर पुनावाला हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथे टाईम्स युके या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावर काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे तर काही जण त्यांना धमक्या देत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या माहितीने देशात एकच खळबळ उडाली होती.

हे ही वाचा:

आसाममध्ये भाजपाचा दणदणीत विजय निश्चित

तामिळनाडूत सत्ताबदलाचे वारे?

भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

अशातच आता इंडिया टूडे वाहिनीचे वृत्तनिवेदक राहुल कंवल यांनी या विषयात एक खळबळजनक खुलासा केला आहे. “पुनावाला यांनी आपल्याला काही व्हिडिओ पाठवले. यातील एका व्हिडिओत शिवसेनेचे गुंड पुनावाला यांच्या कारखान्याबाहेर जाऊन त्यांना शिवीगाळ करत आहेत आणि ‘पहिले लस आम्हालाच मिळाली पाहिजे’ असे सांगताना दिसत आहेत.” असे कंवल यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे कंवल यांचे म्हणणे खरे मानले तर राज्यातल्या प्रमुख सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच कायदा सुव्यवस्था हातात घेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण यापूर्वीही त्याप्रकारच्या घटना राज्यात दिसून आल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

एक कमेंट

  1. हे सत्य नाकारता येणार नाही. शिवसेना म्हणजे गुंडगिरी.
    ह्यांनी आता कमरेचं सोडून डोक्याला बांधले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा