31 C
Mumbai
Tuesday, September 22, 2026
घरराजकारणआपमधून नाराज होऊन बाहेर पडल्यानंतर कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

आपमधून नाराज होऊन बाहेर पडल्यानंतर कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

भाजप मुख्यालयात त्यांनी अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व घेतले

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

दिल्लीचे परिवहन मंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात कैलाश गेहलोत यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने राजीनामा देत असल्याचे कारण सांगितले आहे. दरम्यान, कैलाश गेहलोत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुख्यालयात त्यांनी अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व घेतले.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलाश गेहलोत म्हणाले की, आम आदमी पार्टी सोडणे सोपे नव्हते. हा निर्णय मी एका रात्रीत घेतलेला नाही. मी कोणाच्या तरी दबावाखाली हा निर्णय घेतला आहे, असे जे वर्णन करत आहेत, ते चुकीचे आहे. आजपर्यंत मी कधीही कोणाच्या दबावाखाली काम केलेले नाही. २०१५ पासूनच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही कोणाच्या दबावाखाली काहीही केले नाही. हा गैरसमज आहे. ईडी किंवा सीबीआयच्या दबावाखाली आम आदमी पक्ष सोडल्याचे जे कथन केले जात आहे ते चुकीचे आहे. मी व्यवसायाने वकील असून कायद्याची प्रॅक्टिस सोडली आणि आम आदमी पार्टीमध्ये सामील झालो कारण आम्हाला पक्षातील एका व्यक्तीमध्ये आशा दिसली. जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय होते.

हे ही वाचा : 

औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ, उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ!

दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!

मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!

ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!

दिल्लीतील परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, महिला व बालविकास यासारखे खाते असलेले मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपला राजीनामा दिल्ली सरकारच्या एनसीटीच्या मंत्रीपरिषदेकडे सादर केला आहे. दिल्लीतील जनतेला दिलेली महत्त्वाची आश्वासने पूर्ण करण्यात पक्षाच्या असमर्थतेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यमुना नदी स्वच्छ करण्यात आलेले अपयश त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. केजरीवाल सरकारमधील प्रमुख मंत्री गेहलोत यांचा राजीनामा आम आदमी पक्षासाठी एक धक्का मानला जात आहे. विशेषतः पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत, त्यापूर्वी हा पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा