31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषऔरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ, उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ!

औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ, उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ!

भाजपा महिला नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्याकडून ठाकरेंच्या सभेंचा व्हिडीओ पोस्ट

Google News Follow

Related

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचार सभेचा धडाका सुरु असून नेत्यांच्या सभेसाठी कार्यकर्त्येही गर्दी करत आहेत. २० नोव्हेंबर रोजी निवडणूक असल्याने प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, सर्व नेत्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. तत्पूर्वी, शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकांसाठी मोठ्या प्रमाणात खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत, मात्र बऱ्याच खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसत आहे. यावरून भाजपा महिला नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ, उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ,’ असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

आमदार चित्रा वाघ यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे भाषण देत आहेत, मात्र सभेमधील बऱ्यापैकी खुर्च्या रिकाम्या आहेत. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोकांची संख्या कमी आणि खुर्च्यांची सांख्य जास्त असल्याचे दिसून आले आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या सभेला लोकांनी फिरवलेली पाठ सपशेल दिसून येते. तसेच उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून केवळ महायुती आणि मोदी सरकारवर टीका करताना दिसतात.

हे ही वाचा : 

दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!

मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!

ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!

दिल्लीत प्रदूषणाची पातळी ‘गंभीर’; ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू

यावरून आमदार चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. सभेचा व्हिडीओ पोस्टकरत चित्रा वाघ म्हणाल्या, औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ..उद्धव ठाकरे तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि संस्कार सोडले…सत्तेसाठी हिंदुत्व सोडले…शिवसैनिकांचा विचार केला नाही आणि आता तर थेट औरंग्या फॅन क्लबचे मेंबर झालात. त्यामुळेच जनाब ठाकरेंची साथ जनतेने सोडली आहे, असे चित्रा वाघ म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा