29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरराजकारण‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला’

‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला’

Google News Follow

Related

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ते अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमधील हिंसाचाराविषयी आणि त्यानंतर त्यांना अमरावतीमध्ये येण्यासाठी रोखण्यात आले यावर किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केले.

किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही-९’शी बोलताना सांगितले की, ‘उद्धव ठाकरे आणि ठाकरे- पवारांचे सरकार यांचे घोटाळे बाहेर आले तरीही किरीट सोमय्यांनाच ते थांबवतात. कोल्हापुरातही सोमय्यांनाच थांबवले जाते. हिंदुंवर अत्याचार होत असतात तेव्हा देखील तिथे जाण्यास किरीट सोमय्यांवर प्रतिबंध लावले जातात. १२ नोव्हेंबरला ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या समर्थनाने तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आले. त्याच दिवशी मला यायचं होतं, पण मला रोखलं गेलं. मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, म्हणून आज मी अमरावतीला आलो आहे,’ असे किरीट सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

‘पाप झाकण्यासाठी कोरोनावर खापर फोडायचे, फ्रंटलाईन वर्कर्सने केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेने मिरवायचे’

पीटरसनने का मानले पंतप्रधान मोदींचे आभार?

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; काँग्रेसला दूर ठेवणार

पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ

बाळासाहेब ठाकरे हे १९९२- ९३ च्या दंगलीत रस्त्यावर उतरले होते. आता हिंदू मार खाणार नाही आणि उद्धव ठाकरे त्या मुस्लिमांचे तीन ठिकाणी मोर्चे निघाले दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद उमटले तर हिंसाचार म्हणता. हा मुस्लिमांचा अत्याचार आहे, उद्धव ठाकरे सरकारमुळे आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला, अशी घणाघाती टीका सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा